single voting tension for balasaheb and ranjan taware | Sarkarnama

`सिंगल वोटिंग`चे बाळासाहेबांना आणि रंजनकाकांना टेन्शन!

कल्याण पाचंगणे
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

...

माळेगाव : माळेगाव कारखाना निवडणूकीत राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष व नीलकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार बाळासाहेब तावरे विरुद्ध सत्ताधारी शेतकरी पॅनेलचे उमेदवार व अध्यक्ष रंजन तावरे या दिग्गज नेत्यांनी राजकियदृष्ट्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषतः मागिल निवडणुकीत झालेले `सिंन्गल वोटींग` विचारात घेता वरील दोन्ही नेत्यांचा यंदाच्या निवडणूकीत `पॅनेल टू पॅनेल` मतदान करून घेण्यासाठी कस लागणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत नीलकंठेश्वर पॅनेलमध्ये नविन व जुने अनुभवी चेहरे रिंगणात उतरविले आहेत. त्यानुसार माळेगाव गटामध्ये  ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ सहकार क्षेत्रात काम केले बाळासाहेब तावरे, माजी संचालक पोपटराव बुरुंगले व माळेगाव खुर्दचे माजी सरपंच संजय काटे हे मातंब्बर उमेदवार कपबशीच्या चिन्हावर लढत आहेत, तर सत्ताधारी शेतकरी पॅनेलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी माळेगाव गटातमध्ये उमेदवारी देताना काहीसा बदल करीत गजानन उर्फ संग्राम काटे हे उमेदवार नव्याने घेतले आहेत. त्यानुसार रंजन तावरे, स्वरूप वाघमोडे आणि संग्राम काटे हे उमेदवार किटली हे चिन्ह घेवून राष्ट्रवादीवाल्यांपुढे आव्हान उभे करीत आहेत.

दरम्यान, बाळासाहेब तावरे हे अनेक वर्षांपासून माळेगाव गटातून प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी १४ वर्षांपेक्षा अधिक काळ माळेगावचे अध्यक्षपद भूषविले आहे. दरम्यानच्या काळत तावरे यांनी एफआरपीपेक्षा अधिकचा राज्यात प्रथम क्रमांकाचा दर दिल्याचे अहवालात नोंद आहे. साखर निर्मितीबरोबर महत्वकांक्षी सहवीजनिर्मिती प्रकल्प, शरद सभागृह, इंग्रजी शाळा, मुला-मुलींची वसहतीगृह आदी प्रकल्प उभारून माळेगावचा नावलौकीक वाढविण्यासाठी बाळासाहेबांचे योगदान महत्वपुर्ण ठरते. तसेच साखर कामगारांनाही विक्रमी बोनस देवून त्यांच्याशी चांगला सलोखा ठेवला.

बाळासाहेबांची लोकप्रियता आणि राष्ट्रवादी पक्षाचे पाठबळ यंदाच्या निवडणूकीत निलकंठेश्वर पॅनेलला फायद्याचे ठरणार आहे. तसेच सन २०१४ चे शेतकरी पॅनेलचे उमेदवार राजेंद्र बुरुंगले, अविनाश गोफणे हे राष्ट्रवादीच्या बरोबर राहून नीलकंठेश्वर पॅनेलचे काम करीत आहेत. दुसरीकडे, रंजन तावरे यांनीही पुर्वी ऊस दरासाठी केलेली आंदोलने आणि ते अध्यक्ष झाल्यानंतर गेली चार वर्षे सभासदांना मिळालेला अधिकचा ऊस दर या निवडणूकीत विजयापर्यंत पोचवतो का ? हे पाहणे उत्सूकते आहे. निवडणूक तोंडावर तावरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सभासदांमध्ये त्यांना सहानभूती मिळाली आहे.

माळेगाव गटातून तावरे, येळे, बुरुंगले, गोफणे वगळता कोणत्याही आडनावांना अनेक वर्षांपासून कारखान्याला प्रतिनिधीत्व मिळाले नाही. त्यामुळे जाधवराव, पैठणकर, पवार, लोणकर, काटे, सस्ते, निंबाळकर, जाधव, भोसले आदी आडनावांचे मोठ्या संख्यने असलेले मतदार कोणत्या पॅनेलला अधिकची पसंती देतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख