जामनेर मतदार संघात मंत्री गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज 

भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणूकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षातर्फे औद्यौगिक वसाहतीतील बालाणी रिसॉर्ट येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. राज्याचे उर्जामंत्री व पक्षाचे जिल्हा प्रभारी मदन येरावर, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, खासदार उन्मेश पाटील यांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी उमेदवारांना शक्तीप्रदर्शन न करण्याचे आव्हान करण्यात आले होते.
Girish Mahajan
Girish Mahajan

जळगाव : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघासाठी भाजपतर्फे आज 164 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. सर्वात जास्त चाळीसगाव मतदार संघात 35 तर जामनेरातून मंत्री गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज आला आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे मुक्ताईनगरातून चार उमेदवार इच्छुक आहेत. 

भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणूकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षातर्फे औद्यौगिक वसाहतीतील बालाणी रिसॉर्ट येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. राज्याचे उर्जामंत्री व पक्षाचे जिल्हा प्रभारी मदन येरावर, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, खासदार उन्मेश पाटील यांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी उमेदवारांना शक्तीप्रदर्शन न करण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांना सोबत न घेता फक्त उमेदवार मुलाखतीस हजर होते. जिल्ह्यातील अकरा मतदार संघातून तब्बल 164 जणांनी उमेदवारीची तयारी दाखविली आहे. 

विधानसभा निहाय इच्छुक उमेदवारांची संख्या अशी : जळगाव शहर 20,जळगाव ग्रामीण -14, रावेर -14, चोपडा-12, अमळनेर-22, भुसावळ06,एरंडोल-10, मुक्ताईनगर-04,पाचोरा-24,चाळीसगाव 35,जामनेर-01 

चाळीसगावातुन खासदार पत्नी इच्छुक 
चाळीसगाव मतदार संघातून सर्वात 35 जण इच्छुक आहेत. यात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी सौ.संपदा पाटील या सुध्दा इच्छुक आहेत. तर काही इच्छुकांनी समजलेली नावे अशी:डॉ.विनोद कोतकर, प्रफुल्ल सांळुखे, चित्रसेन पाटील, डॉ.सजीव पाटील, पोपटतात्या भोळे, मंगेश चव्हाण, राजेंद्र अण्णा, किशोर पाटील(धोमणेकर), अविनाश सूर्यवंशी (वाघळी), किशोर पाटील (करजगाव), संभाजीराजे पाटील (सायगाव),समाधान पाटील, धर्मा वाघ (दहिवद), सतिषतात्या दराडे, उध्दवराव महाजन, डॉ.उत्तमराव महाजन, संजय भास्कर पाटील, 
 
मुक्ताईनगरात चार जण 
मुक्ताईनगर मतदार संघात यावेळी प्रथमच आठ जणांनी उमेदवारीची तयारी दाखविली आहे. यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, विद्यमान उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांच्यासह चार जण इच्छुक आहेत. ऍड.रोहिणी खडसेंच्या नावाची चर्चा होती मात्र त्यांचा अर्ज नसल्याचे सांगण्यात आले. 
 
जामनेरात फक्त महाजन 
जामनेर विधानसभा मतदार संघातून राज्याचे जलसपंदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला आहे. याशिवाय अमळनेर मतदार संघातून आमदार स्मिता वाघ यांच्यासह तब्बल 22 जण इच्छुक आहेत. जळगावातून आमदार सुरेश भोळे यांच्यासह 20 जण इच्छुक आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com