सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कॉंग्रेसकडे 

 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कॉंग्रेसकडे 

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर सत्ता राखण्यात कॉंग्रेसने यश मिळविले; मात्र शिवसेनेने अनेक भागांत मुसंडी मारली. जिल्ह्यात आठपैकी चार पंचायत
समित्या युतीकडे, तीन कॉंग्रेसकडे तर एक त्रिशंकू बनली आहे. 

जिल्हा परिषदेत 2012 मध्ये कॉंग्रेसने 33 जागा मिळविल्या होत्या. त्यांच्या जागा कमी होत या वेळी 27 वर पोहोचल्या आहेत. आता या वेळचे जिल्हा परिषदेचे
पक्षीय बलाबल कॉंग्रेस 27, शिवसेना 16, भाजप 6 आणि राष्ट्रवादी 1 असे आहे. कॉंग्रेसने निर्विवाद यश मिळविले असले तरी गेल्या वेळच्या तुलनेत त्यांची संख्या
घटली आहे. शिवसेनेने गेल्या वेळच्या 4 जागांवरून 16 पर्यंत मुसंडी मारली आहे. 

जिल्ह्यातील 8 पैकी 4 पंचायत समित्या युतीकडे आल्या आहेत. यात वेंगुर्ले, कुडाळ, देवगड आणि दोडामार्गचा समावेश आहे. मालवण, कणकवली आणि सावंतवाडीत
कॉंग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले. वैभववाडीत कॉंग्रेस आणि युतीच्या समान जागा झाल्यामुळे तेथील स्थिती त्रिशंकू राहिली आहे. 


राजकीय बलाबल 
* पालकमंत्री दीपक केसरकरांचा बालेकिल्ला असलेल्या सावंतवाडी तालुक्‍यात कॉंग्रेसची सरशी 
* कणकवलीमध्ये कॉंग्रेसकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकत विरोधकांना व्हाईटवॉश 
* कुडाळमध्ये शिवसेनेच्या वैभव नाईकांनी वर्चस्व राखले. 
* मालवणात मात्र कॉंग्रेसची मुसंडी 
* नीतेश राणेंचे वर्चस्व असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड, वैभववाडी तालुक्‍यात युतीची मुसंडी 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com