बैठक घेऊन आमदार वैभव नाईकांची नौटंकी : अतुल काळसेकर

जिल्ह्यातील आठही तालुक्‍यातील भात खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसात ती सुरू होईल. त्यामुळे सत्तेत असताना सुद्धा त्याची माहिती नसलेल्या आमदार नाईक यांनी नौटंकी करू नये, असा सल्ला काळसेकर यांनी येथे दिला. भातखरेदी तात्काळ करण्यात यावी, यासाठी आमदार नाईक यांनी कणकवली येथे मार्केटिंग फेडरेशनच्या संचालकांची भेट घेतली होती. याला काळसेकर यांनी विरोध केला.
Sindhudurg District Bank Director Atul Kalsekar Criticism on MLA Vaibhav Naik
Sindhudurg District Bank Director Atul Kalsekar Criticism on MLA Vaibhav Naik

सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भात खरेदीसाठी शासनाने मान्यता दिली होती; पण आचारसंहितेच्या कारणामुळे प्रशासकीय यंत्रणा गप्प राहिली. आता शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक बैठक घेऊन नौटंकी करत आहेत, अशी टीका जिल्हा बॅंक संचालक अतुल काळसेकर यांनी येथे केली.

जिल्ह्यातील आठही तालुक्‍यातील भात खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसात ती सुरू होईल. त्यामुळे सत्तेत असताना सुद्धा त्याची माहिती नसलेल्या आमदार नाईक यांनी नौटंकी करू नये, असा सल्ला काळसेकर यांनी येथे दिला. भातखरेदी तात्काळ करण्यात यावी, यासाठी आमदार नाईक यांनी कणकवली येथे मार्केटिंग फेडरेशनच्या संचालकांची भेट घेतली होती. याला काळसेकर यांनी विरोध केला.

ते म्हणाले, "हा सर्व प्रकार म्हणजे केवळ नौटंकी आहे. हा प्रश्‍न मार्गी लागेल यासाठी आम्ही गेले अनेक दिवस प्रयत्न करत होतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भात खरेदीसाठी शासनाने मान्यता दिली; पण आचारसंहितेच्या कारणांमुळे प्रशासकीय यंत्रणा गप्प बसली. हे आमदार नाईक यांना माहिती नाही हे दुर्दैव आहे. सद्यस्थिती लक्षात घेता 2300 ते 2400 प्रति क्‍विंटलपर्यंत दर शेतकऱ्यांना मिळणार आहे. येत्या दोन दिवसात भात खरेदी सुरू होईल; मात्र सत्तेत असताना सुद्‌धा विरोधात असल्याचे वागत आहे. त्यामुळे त्यांना नौटंकी करणे बंद करावे. शेतकरी खरेदी विक्री संघ शहरात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार प्रकिया सुरू झाली आहे.''
 
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com