सत्तार यांच्या ताब्यातील सिल्लोड नगरपरिषदेकडून वीस हजार  मास्क, दहा हजार साबणाचे वाटप

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरातील गरजू नागरिकांना 20 हजारमास्क तसेच 10 हजार साबणाचे वाटप करण्यात आले.
Sillod council distributes 20000 masks and 10000 soaps
Sillod council distributes 20000 masks and 10000 soaps


औरंगाबाद: महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरातील गरजू नागरिकांना 20 हजार मास्क तसेच 10  हजार साबणाचे वाटप करण्यात आले.

 नागरिकांच्या सुरक्षेसाठी मास्क , साबण वाटप करीत स्वच्छता व निर्जंतुकीकरणासाठी असा उपक्रम राबविण्यात सिल्लोड नगरपरिषद आघाडीवर आहे.अब्दुल सत्तार यांनी स्वतः नागरिकांना मास्क व साबणाचे वाटप करीत या उपक्रमाची पाहणी केली. 

नागरिकांनी नगरपरिषदेच्या वतीने वाटण्यात येत असलेल्या साबणाने वेळोवेळी हात धुवावे आणि मास्कचा वापर करावा असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी नागरिकांना केले.

नगरपरिषदेच्या वतीने शहर तसेच वाडी वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.  त्या अंतर्गतआज नागरिकांना 20 हजार मास्क तसेच 10 हजार साबणाचे वाटप करण्यात आले. कोरोनाव्हायरस पासून नागरिकांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहेत. 

शहरात विविध ठिकाणी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना हात धुण्यासाठी नगर परिषदेने अनेक ठिकाणी  व्यवस्था देखिल केली आहे. 

शासनाच्यावतीने देण्यात येणारे धान्य येत्या 4 तारखेपर्यंत नागरिकांना मिळेल असे सांगतानाच सर्वांनी घरी राहून स्वतः ची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी व शासनाच्या आदेशाचे पालन करावे असे अवाहनही सत्तार यांनी केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com