सिद्धार्थ शिरोळेंचा अर्ज भरायला विजय काळे उपस्थित

सिद्धार्थ शिरोळेंचा अर्ज भरायला विजय काळे उपस्थित

पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी पक्षाने मला दिली आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणुकीत निश्‍चितपणे विजयी होईन, असा विश्‍वास भाजप-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगरचे उमेदवार नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.

नगरसेवक शिरोळे यांनी शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा मंदिरात दर्शन घेऊन मिरवणुकीला सुरूवात केली. मिरवणुकीने जाऊन मोठे शक्तीप्रदर्शन केले. आमदार विजय काळे, माजी खासदार अनिल शिरोळे, शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, नगरसेवक प्रकाश ढोरे, आदित्य माळवे, मधुकर मुसळे, विजय शेवाळे आदी सहभागी झाले होते.

विजय काळे यांचे तिकिट डावलून शिरोळे यांना देण्यात आले आहे. शिरोळेंचा अर्ज दाखल करताना काळे उपस्थित राहिल्याने भाजपमधील नाराजी नाट्यावर पडदा पडल्याचा संदेश गेला. 

यावेळी बोलताना नगरसेवक शिरोळे म्हणाले,"" शिवाजीनगर मतदारसंघात आज अर्ज भरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मतदारांच्या आशिर्वादाने मतदारसंघाच्या नियोजनबद्ध विकासासाठी मी बहुमताने मी निवडून येईन. भाजपाची प्रचाराची यंत्रणा तयार आहे. शिवसैनिकांशी माझी चर्चा सुरू आहे. त्यांचे मला सहकार्य आहे.''

प्रचाराच्या काळात जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोचण्याचे मोठे आव्हान आहे. मोठ्या सभा, मेळावे बैठकांशिवाय कोपरा सभा, छोट्या बैठका व वैयक्तिक संपर्कावर भर देणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले. मतदारसंघातील सर्व थरातील लोकांपर्यंत पोचण्याचा आपला प्रयत्न राहील. मतदारसंघातील सर्व समाज घटकांशी चांगला संपर्क आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने हा संपर्क आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे नगरसेवक शिरोळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com