siddharamaya | Sarkarnama

कर्नाटकात मुदतपूर्व विधानसभेची निवडणूक ?

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

बंगळूर : कर्नाटकात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने विजय खेचून आणल्याने राज्यात पुन्हा कॉंग्रेसचेच सरकार आणण्याच्या हालचाली पक्षाच्या नेत्यांनी सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपला कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी निवडणूक घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे, तसे झाल्यास राज्यात मे 2018 मध्ये निवडणूक होऊ शकते. मात्र, पक्षाच्या काही नेत्यांनी तसे होणार नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि ठरलेल्या वेळीच निवडणूक होईल असे म्हटले आहे. 

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर विविध राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपची सरकारे आली आहेत. भाजप ओडिशाबरोबरच कर्नाटकावर डोळा आहे. यापूर्वी राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर होते. मात्र, भ्रष्टाचाराच्या मुुद्यावर या सरकारला मतदारांनी खाली खेचत कॉंग्रेसला विजयी केले होते. मोदी लाटेचा कर्नाटकात फटका बसू नये यासाठी मुदत संपण्यापूर्वीच निवडणूक घेण्याच्या हालचाली कॉंग्रेसमध्ये सुरू असल्याचे समजते. 

याबाबत कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी पत्रकारांना सांगितले, की सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि त्यानंतरच राज्यात निवडणूक होईल. मात्र कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत मौन पाळले असून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे. 

दरम्यान, 2004 मध्ये एस एम कृष्णा यांचे सरकार राज्यात सत्तेवर होते. त्यावेळी कॉंग्रेसने मुदत संपण्यापूर्वीच निवडणूक घेतली होती आणि त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली होती याकडेही एका कॉंग्रेस नेत्याने लक्ष वेधले. मुदतपूर्व निवडणूक घ्यावी की घेऊ नये या मुद्दयावरू कॉंग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. शेवटी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे जो निर्णय घेतील त्याप्रमाणे होईल असे कॉंग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे म्हणणे आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख