Shweta singhal transferred as additional commissioner pune , shekhar singh will be collector satara | Sarkarnama

श्वेता सिंघल पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त तर शेखर सिंह साताऱ्याचे जिल्हाधिकारी

सरकारनामा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

श्वेता सिंघल यांनी आपल्या  कार्यकाळात त्यांनी प्रशासनावर आपली पक्कड ठेवली होती. विशेष करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध कारणांनी होणारी आंदोलने बऱ्यापैकी कमी करण्यात त्यांनी यश मिळवले होते.

सातारा : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची पुणे येथे अतिरिक्त आयुक्त पदी बदली झाली आहे. साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून शेखर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. श्वेता सिंघल यांनी गेल्या तीन वर्ष्यात विधानसभा, लोकसभा निवडणुकीसह दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती यशस्वी हाताळली होती. नवे जिल्हाधिकारी शेखर सिंह हे यापूर्वी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. येत्या दोन चार दिवसांत ते पदभार स्वीकारणार आहेत.

 

श्वेता सिंघल यांनी आपल्या  कार्यकाळात त्यांनी प्रशासनावर आपली पक्कड ठेवली होती. विशेष करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध कारणांनी होणारी आंदोलने बऱ्यापैकी कमी करण्यात त्यांनी यश मिळवले होते.

दुष्काळ सचोटीने हाताळला तसेच अतिवृष्टी, अवकाळीने निर्माण झालेली पूर परिस्थिती त्यांनी यशस्वीपणे हाताळली होती. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा, विधानभेसह लोकसभेची पोट निवडणूक त्यांनी कोणताही वाद न होता कुशलतेने हाताळल्या.

नवे जिल्हाधिकारी शेखर सिंह हे 2012 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी नागपूरला प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले आहे. रामटेकला प्रांताधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला आहे. मनमिळावू स्वभाव आणि चांगले प्रशासकीय कामकाज करताना अधिकारी आणि कर्मचारी यांना व्यसनमुक्त करण्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे.

सरकारनामाशी बोलताना शेखर सिंह म्हणाले, गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि पर्यावरण पुरक जिल्ह्यात काम करताना कायदा आणि सुव्यवस्था राखताना तेथील स्थानिक नागरीकांचा विश्‍वास मिळविला. विविध योजना लोकांपर्यंत पोचवितानाच पर्यावरणविषय योजनांची अंमलबजावणी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांतील व्यसनाधिनता कमी करण्यावर भर दिला. 

गडचिरोलीचा पदभार घेण्यासाठी नवीन अधिकारी आल्यानंतर साताऱ्यात येऊन दोन चार दिवसांत पदभार स्विकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख