औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्यसाठी शिवसेनेकडून झाल्या खोतकर, वैद्य, त्रिवेदी, चव्हाण यांच्या मुलाखती

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्यसाठी शिवसेनेकडून झाल्या खोतकर, वैद्य, त्रिवेदी, चव्हाण यांच्या मुलाखती

औरंगाबाद : जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पुर्व विधानसभा मतदारसंघाचे शहरप्रमुख राजू वैद्य, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्यासह वैजापूर नगरपारिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश चव्हाण यांनी आज मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. सायंकाळी किंवा उद्या उमेदवाराचे नाव घोषित करण्यात येणार असल्याचे समजते. 

येत्या 19 ऑगस्ट रोजी मतदान होणाऱ्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार कोण असेल याची उत्सूकता शिगेला पोचली आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने आज दुपारी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती मातोश्रीवर पार पडल्या. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वतंत्रपणे इच्छुकांशी आधी चर्चा केली. अर्जुन खोतकर, राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी व वैजापूर येथील प्रकाश चव्हाण यांनीदेखील इच्छूक म्हणून या मुलाखतीला हजेरी लावली होती. 

सुभाष देसाईंनी इच्छुकांशी चर्चा केल्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. निवडूण येण्याची क्षमता, रणनिती आदींवर चर्चा केल्यानंतर सायंकाळी किंवा उद्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली जाईल असे उद्धव ठाकरे यांनी या इच्छुकांना सांगितले. उमेदवारी कुणालाही मिळो विजय आपलाच झाला पाहिजे असे आवाहन देखील ठाकरे यांनी संबंधितांना केल्याची माहिती आहे. 

विनोद पाटील आलेच नाही.... 
मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र आजच्या मुलाखतीकडे त्यांनी पाठ फिरवल्याचे समजते. यावरून विनोद पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माघार घेतल्याचे बोलले जाते. या उलट चर्चेत नसलेले वैजापूर नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश चव्हाण यांचे नाव अचानक समोर आले. माजी आमदार आर. एम. वाणी यांनी त्यांच्या नावाची शिफारस पक्षप्रमुखांकडे केल्याचे बोलले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com