shrirampur sand issue | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

श्रीरामपूरच्या वाळू तस्कराचे करायचे काय? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

 श्रीरामपूर तालुक्‍यातील मालुंजे बुद्रूक येथील कामगार तलाठी बाबासाहेब पंडीत यांना दमदाटी करून लॅपटॉप फोडल्याप्रकरणी वाळूतस्कारावर गुन्हा दाखल झाला आहे. 

नगर : श्रीरामपूर तालुक्‍यातील मालुंजे बुद्रूक येथील कामगार तलाठी बाबासाहेब पंडीत यांना दमदाटी करून लॅपटॉप फोडल्याप्रकरणी वाळूतस्कारावर गुन्हा दाखल झाला आहे. 

तलाठी बाबासाहेब पंडीत यांना वाळूतस्कराने कार्यालयात घुसून मारहाण करत त्यांचा लॅपटॉप फोडल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडीत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विश्‍वजीत उर्फ बच्चू दिनकर बडाख याने वाळूतस्करी केल्याप्रकरणी महसूल खात्याने त्याच्या सातबारा उताऱ्यावर एक कोटी 96 लाख 14 हजार 425 रुपये बोजा चढविलेला आहे. त्यानंतरही त्याच्याकडून अवैध वाळूवाहतून सुरू असून, गेल्या वर्षभरात वेळोवेळी त्याची वाळूची वाहने पकडण्यात आली. त्यातील पाच डंपर बेलापूर पोलिस चौकीत जमा आहे. त्याचा राग धरून बच्चू बडाख याने गुरुवारी दुपारी कार्यालयात घुसून शिवीगाळ, दमदाटी व धक्‍काबुक्‍की करीत कार्यालयाच्या कामकाजाचा लॅपटॉप फोडला. या प्रकारामुळे वाळुतस्करीबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख