श्रीरामपूरमधील 'आमचं ठरलंय..'चा फलक पोलिसांनी हटवला!  

फलकांची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने फलक हटविले. नगर पालिका हद्दीत फलक असल्याने याबाबत पालिकेशी पत्र व्यवहार केला जाईल. कोणी तक्रार दिल्यास संबधितावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करु, असे पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले.
श्रीरामपूरमधील 'आमचं ठरलंय..'चा फलक पोलिसांनी हटवला!   

श्रीरामपूर (नगर) : 'आमचं ठरलंय...ससाणे, विखे, थोरात यांना फसविणाऱया आमदाराला पाडायचं' अशा आशयाचे शहरात विविध ठिकाणी फलक लावल्याने श्रीरामपूरात चर्चेला उधान आले आहे. दुपारनंतर हे फलक पोलिसांनी हटविले.

कॉंग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकत भगवा झेंडा हाती घेतला. त्यांनी उचललेले पाऊल न पटल्याने अज्ञात व्यक्तींनी फलकाद्वारे शहरात बॅनरबाजी सरु केली. ही फलकबाजी कांबळे यांनी डोकेदुखी ठरत आहे.

श्रीरामपुरचे राजकारण ससाणे, मुरकुटे, आदिक या प्रमुख राजकीय गटा भोवती फिरते. श्रीरामपूर मतदारसंघ २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यावेळी विखेपाटील यांच्या पुढाकारतुन स्व. जयंत ससाणे यांनी कांबळे यांना विधानसभेची संधी दिली. स्व. ससाणे य़ांच्या मदतीने कांबळे दोन वेळा आमदार झाले. मात्र नगरपालिका निवडणुकीनंतर कांबळे यांनी ससाणे यांची साथ सोडली. ही बाब ससाणे समर्थकांना रुचली नाही. समर्थकांनी कांबळे यांच्या घरी जाऊन रोष व्यक्त केला. त्यानंतर कांबळे ससाणे य़ांच्या दुरावा निर्माण झाला होता. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विखेपाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी कांबळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने शिर्डी मतदारसंघातुन उमेदवारी केली. त्यात त्यांचा पराभव झाला. कांबळे यांनी गेल्या आठवड्यात उध्दव ठाकरे यांची भेट घेवुन सेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने थोरातांनाही धक्का बसला. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी यास विरोध असल्याचे पत्रकार परिषेदेत जाहिर केले होते. तरीही त्यांचा पक्ष प्रवेश झाला. सर्व बाजुने असलेल्या विरोधी वातावरणाच्या पाश्वभुमीवर रात्री अचानकपणे फलक लागले. हे फलक कोणी लावले हे मात्र गुलदस्त्यात आहे.  

विधानसभा निवडणुकीसाठी निवृत्त शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, साहित्यिक लहु कानडे, येवला बाजार समितीचे माजी सभापती देविदास निकम व खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या मुलगा चेतन यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र कांबळेंच्या प्रवेशाने त्यांची कोंडी झाली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com