Sarkarnama Exclusive : रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे श्रीराम पाटील निश्‍चित

Sarkarnama Exclusive : रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे श्रीराम पाटील निश्‍चित

जळगाव, ता. 25 : जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपतर्फे एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या उमेदवार आहेत. त्यांच्या विरूध्द राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे श्रीराम पाटील यांचे नाव निश्‍चित झाले असून त्याबाबतची घोषणा पक्षातर्फे लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

रावेर लोकसभा मतदार संघ कॉंग्रेस की राष्ट्रवादी कॉंग्रेस लढणार याबाबत तिढा निर्माण झाला होता. कॉंग्रेसकडे या जागेसाठी उल्हास पाटील उमेदवार असल्यामुळे त्यांनी जागेची मागणी केली होती. हा तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड आज जळगावात आले होते. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससह कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्याही बैठका घेतल्या. जळगाव लोकसभेचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या निवासस्थानी चर्चा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी येत्या दोन दिवसात उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल अशी घोषणा केली. अन मुंबईला जाण्यासाठी ते रवाना झाले.

अन हेलीपॅडवर उमेदवाराची भेट
जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड जैन हिल्सच्या हेलीपॅडवरून हेलीकाॅप्टरने मुंबईकडे रवाना होण्याच्या तयारीत असतांनाच माजी खासदार व राष्ट्रवादीचे नेते ईश्‍वरलाल जैन यांनी त्यांना थांबण्याचा संदेश दिला. त्यानंतर तब्बल ४० मिनीटे ते थांबले, त्यावेळी जैन हे उमेदवाराला घेवून आले. श्रीराम प्लास्टचे संचालक श्रीराम पाटील यांना ते सोबतच घेवून आले होते. त्यांनी जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड यांची श्रीराम पाटील यांची भेट घालून दिली. हे आपले रावेर मतदार संघातील उमेदवार असल्याचे सांगितले. पाटील यांनीही त्याला संमती दिली असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबतची अधिकृत ते लवकरच करणार असल्याची माहितीही सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

कोण आहेत श्रीराम पाटील
श्रीराम पाटील हे रावेर येथील श्रीराम प्लास्ट, श्री साईराम इरिगेशन ते संचालक आहेत. मूळ बोदवड तालुक्‍यातील निमखेड येथील रहिवाशी आहेत. रावेर ही त्यांची कर्मभूमी आहे. बजाज कंपनीच्या वाहनाचे ते वितरक आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com