Shripad Chindam Bowed in Front of Shivaji Maharaj Statue | Sarkarnama

महाराजांसमोर श्रीपाद छिंदम झाला नतमस्तक.....

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 डिसेंबर 2018

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारणारा श्रीपाद छिंदम आज (ता.12) शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला. महानगरपालिका निवडणूकीनंतर नगर शहरात येऊन श्रीपाद छिंदमने शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छिंदम महाराजांपुढे नतमस्तक झाला. यावेळी त्याने सर्व मतदारांचेही आभार मानले.

नगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारणारा श्रीपाद छिंदम आज (ता.12) शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला. महानगरपालिका निवडणूकीनंतर नगर शहरात येऊन श्रीपाद छिंदमने शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छिंदम महाराजांपुढे नतमस्तक झाला. यावेळी त्याने सर्व मतदारांचेही आभार मानले.

यावेळी, शिवाजी महाराजांसोबतच महात्मा ज्योतिबा फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे या महामानवांसमोरही तो नतमस्तक झाला आणि त्यांना अभिवादन केले. महापालिका निवडणुकानंतर श्रीपाद छिंदम हा पहिल्यांदाच नगर शहरात आला होता. त्यावेळी, तो बोलत होता. या महामानवांच्या आशिर्वादानेच आपल्याला महापालिकेत विजय मिळाला असल्याचे मतही त्याने व्यक्त केले.

शिवाजी महाराज यांच्याविषयी अलीकडेच अपशब्द उच्चारल्यामुळे छिंदम मोठ्या वादात सापडला होता. परंतु, नगर महापालिकेच्या निवडणुकीत तो विजयी झाला. प्रभाग क्र. 9 (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख