shripad chindam arrivres in corporation in police protection | Sarkarnama

श्रीपाद छिंदम महासभेला आला, पोलिस बंदोबस्तात सही करून गेला

मुरलीधर कराळे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नगर ; छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरलेला माजी उपमहापाैर श्रीपाद छिंदम आज महापालिकेच्या विशेष महासभेत आला. कडक पोलिस बंदोबस्तात त्याने अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन मस्टरवर सही करून पोलिस बंदोबस्तात निघून गेला. सभागृहात इतरांनी शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.

महानगरपालिकेने विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत छिंदम येणार असल्याने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याबद्दल छिंदम याच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल होऊन त्याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच आजही त्याच्या घराला पोलिस संरक्षण आहे. या प्रकारामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वातावरण शांत झाल्यानंतर त्याने आपण राजीनामा दिलाच नसल्याचे जाहीर करून ती सही खोटी असल्याचे सांगत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आज महापालिकेची महासभा होती. त्याने पोलिसांकडे संरक्षण मागितले. तसेच प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची काल भेट घेऊन सभेला येणार असल्याचे सांगितले. त्यांनीही पोलिसांना सूचना देऊन छिंदम याला पूर्ण संरक्षण देण्यास सांगितले होते. त्यानुसार तो आज आला व सही करून गेला. या वेळी वातावरण तणावपूर्ण झाले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख