सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी कडून श्रीनिवास पाटील

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी कडून अखेर श्रीनिवास पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून नकार आल्याने राष्ट्रवादीने आज निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजे विरुद्ध माजी राज्यपाल अशी लढत पाहायला मिळणार असून गुरुवारी श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Shriniwas Patil NCP
Shriniwas Patil NCP

सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी कडून अखेर श्रीनिवास पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून नकार आल्याने राष्ट्रवादीने आज निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजे विरुद्ध माजी राज्यपाल अशी लढत पाहायला मिळणार असून गुरुवारी श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रिक्त जागेवर होणाऱ्या पोट निवडणूकित उदयनराजे विरोधात राष्ट्रवादी कडून कोण उमेदवार असेल याचे तर्क वितर्क वर्तविले जात होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सारंग पाटील, सुनील माने, नितीन पाटील यांची नावे पुढे आली. पण सक्षम आणि दमदार उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे होते. मात्र सर्वसमावेशक आणि काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होणारे उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आग्रही होते. 

अगदी सोनिया गांधी यांच्याकडून चव्हाण यांच्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांनी कराड दक्षिण च्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन चाचपनी केली होती. यामध्ये सर्वांनी कराड दक्षिण मधून लढावे असा सूर निघाला  होता. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी काल विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केला. त्यामुळे रात्री उशिरा शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मुळात श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांच्या आदेशाची वाट पाहत होते. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील अशी लढत होणार आहे. श्री. पाटील गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणारआहेत. यावेळी शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com