पळून जाणाऱ्यांना मतदान देऊ नका : श्रीनिवास पाटील

चार महिन्यांपुर्वी राष्ट्रवादीकडून विजयी झालेले आणि आता भाजपचे उमेदवार असलेले उदयनराजे काँग्रेस- राष्ट्रवादीचे टार्गेट आहेत.
पळून जाणाऱ्यांना मतदान देऊ नका : श्रीनिवास पाटील

वहागाव (ता. कऱ्हाड- सातारा) :  पळून जाणाऱ्या उमेदवाराला मत देऊ नका, असे आवाहन सातारा लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी केले.

मी आणि पृथ्वीराजबाबा तुमची अखंड सेवा करणार आहे. आम्हाला निवडून देऊन उपकृत करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक प्रचारार्थ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत श्रीनिवास पाटील यांनी घोणशी, वनवासमाची व खोडशी येथील प्रचार दौरा केला. यावेळी किसनराव पाटील-घोणशीकर, आनंदराव पिसाळ, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, नरेंद्र नांगरे-पाटील, पंचायत समिती सदस्य प्रणव ताटे, सरपंच सुषमा पिसाळ उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील म्हणाले, आम्ही काय केलं हे विरोधी उमेदवार विचारतात. ते विचारायला तुम्ही पाच वर्षानंतर या. याउलट आम्ही आजपर्यंत तुम्हाला वाव दिला. गादीचा मान राखला. पण तुम्ही जनतेला विश्वासात न घेता गेला त्याचे काय, जनतेने आजपर्यंत केलेली चूक सुधारण्याची हीच संधी आहे. आमच्या दोघांसमोर विकासाच्या मुद्यांवर विरोधक चर्चा करू शकत नाहीत. मंदीमुळे कररूपी उत्पन्न घटत चालले आहे. खर्च वाढत चालल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मोडली आहे. हे सुधारायचे असेल, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला व श्रीनिवास पाटील यांना प्रचंड प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. या निवडणुकीत राज्याची भावी दिशा ठरणार आहे, ते ओळखून मतदान करा. आमच्या दोघांचे केंद्र व राज्यातील राजकीय वजन, जेष्ठता, प्रशासकीय अनुभव व आमच्या मनात विकासकामाबाबत कोणताही आकस नाही. या सूत्रांमुळे आम्ही दोघे खूप कामे करू शकलो. गेल्या दहा वर्षात चुकीचा लोकसभा उमेदवार निवडून दिल्यामुळे आपले मत वाया गेले. लोकशाही वाचवण्यासाठी जातीयवादी पक्षांना हद्दपार करा. मतदारसंघात लोकांना भयभीत करून आमिषे दाखवली जात आहेत. कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका. तुमचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. पुन्हा एका पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास पेशवाई यायला वेळ लागणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com