shrinivas patil memories about sharad pawar | Sarkarnama

पवारसाहेबांनी मला हाताने खुणविले व उठू नका, असे सूचविले!  

श्रीनिवास पाटील (माजी राज्यपाल) 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस.

शरद पवार मुख्यमंत्री असताना लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यावेळी मी रिटर्निंग ऑफिसर होतो. मुख्यमंत्री अर्ज भरण्यासाठी आलेत म्हणून मी उठून उभा राहिलो. पण साहेबांनी मला हाताने खुणविले व उठू नका, असे सूचविले. सगळा अर्ज मी न उठता स्विकारला. साहेबांनी तो उभा राहून लिहिला. सर्व प्रक्रिया झाल्यावर जाताना पवार साहेब म्हणाले, श्रीनिवास तुम्ही जिल्हाधिकारी आहात. मी उमेदवार म्हणून तुमच्याकडे आलो आहे. सगळ्याच उमेदवारांचे अर्ज तुम्ही उभे राहून स्वीकारता का, नाही ना. त्यामुळे जी वागणूक सर्वसामान्यांना देता तीच वागणूक मलाही दिली पाहिजे. पवारसाहेबांनी मुख्यमंत्री असूनही राजशिष्टाचार पाळला.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख