भाजपच्या श्रीकांचना यन्नम सोलापूरच्या महापौर - shrikanchana yannac is solapur mayor | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या श्रीकांचना यन्नम सोलापूरच्या महापौर

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

आरक्षण जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची बहुमताने निवड झाली. 

सोलापूर : आरक्षण जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची बहुमताने निवड झाली. 

यन्नम यांनी एमआयएमच्या शहाजीदा बानो शेख यांचा पराभव केला. शिवसेनेच्या सारीका पिसे व कॉंग्रेसच्या फिरदोस पटेल यानी अनपेक्षित माघार घेतल्याने निवडणुकीस वेगळी कलाटणी मिळाली. 

यन्नम यांना ५1 मते, तर शेख यांना 08 मते मिळाली. कॉंग्रेस व शिवसेना, वंचीतचे नगरसेवक तटस्थ राहिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स