Shobha Dey happy by Mumbai Collectors transfer | Sarkarnama

आश्विनी जोशींच्या बदलीने शोभांचा 'डे' ग्लॅड

तुषार खरात
सोमवार, 24 एप्रिल 2017

शोभा डे यांचे ट्वीट

मुंबई: मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची बदली केल्याचा आनंद वादग्रस्त लेखिका शोभा डे यांनी व्यक्त केला आहे. 'मुंबईला झुकते माफ देणाऱ्या उद्दाम अश्विनी जोशी यांची उचलबांगडी केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आभार' असे ट्विट डे यांनी केले आहे.

आश्विनी जोशी यांनी गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या कारवायांमुळे त्या वादात सापडल्या आहेत. विशेषत: आपल्या कार्यकक्षेबाहेर जाऊन जोशी यांनी खंबाटा एव्हीशनचे कार्यालय असलेली चर्चगेट येथील इमारत 'सिल' केली होती. या कारवाईबद्दल जोशी यांच्यावर न्यायालयाने कडक ताशेरे ओढले होते. मुख्यमंत्र्यांनी जोशी यांच्या कामावर लक्ष ठेवावे असे निर्देश न्यायालयाने दिले होते. मुंबईत अनेक भाड्याच्या इमारती आहेत. त्यांवरही जोशी यांनी कारवाई केली होती.

अशा एखाद्या कारवाईमुळेच शोभा डे दुखावल्या असाव्यात. त्यामुळे त्यांनी जोशी यांच्या बदलीबद्दल आनंद व्यक्त केला असावा, असे बोलण्यात येत आहे. विशेष म्हणजे, वादग्रस्त व्यक्ती म्हणून शोभा डे या जोशी यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. मध्य प्रदेशमधील दौलतराम जोगावत या स्थूल पोलिस अधिकारयाचे छायाचित्र पोस्ट करून मुंबई पोलिसांची डे यांनी ट्विटरवर खिल्ली उडविली होती. त्यावर डे यांच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. सतत वादग्रस्त ट्विट करून डे कायमच चर्चेत असतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख