shivtare`s pa joins mns | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

राज्यमंत्री शिवतारेंचा पीए प्रतिस्पर्धी मनसेच्या जाधवरावांकडे पळाला...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे : जलसंपदा राज्यमंत्री  व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहणारे आंबेगाव पठार येथील आनंद यादव यांनी थेट मनसेमध्ये प्रवेश केला. प्रदेश सरचिटणीस बाबाराजे जाधवराव यांनी त्यांचा प्रवेश थेटत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत घडवून आणला.

पुरंदर विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणूक किती चुरशीची होणार, याची झलक या पक्षप्रवेशामुळे दिसली आहे. जाधवराव यांनी यादव यांना थेट राज यांच्याकडेच नेले. पुरंदरमधील शिवसेनेच्या नेत्यांना खिजवण्यासाठीच मनसेची ही कृती असल्याचे बोलले जाते.

आता हे यादव शिवतारे यांचे पीए होते की नाही, यावरून सोशल मिडियात वाद पेटला आहे. शिवतारे समर्थकांच्या म्हणण्यानुसार यादव यांना शिवतारे यांनीच कामावरून काढून टाकले होते. यादव अधिकृत पीए होते की नाही, यावरूनही मनसे आणि शिवसेना समर्थकांत वाद पेटला आहे. 

आमदाराचे पीए प्रतिस्पर्धी नेत्याकडे जाण्याचे प्रकार पुणे जिल्ह्यात याआधीही घडले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर शिरूरचे तत्कालीन आमदार अशोक पवार यांचे पीए महेश बेंद्र हे थेट प्रतिस्पर्धी भाजपचे बाबूराव पाचर्णे यांच्याकडे गेले होते. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख