पुरंदरमध्ये विजय शिवतारेंची हॅटट्रीक निश्चित!

पुरंदरमध्ये विजय शिवतारेंची हॅटट्रीक निश्चित!

सासवड : पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना - भाजप व महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांना पुन्हा चांगल्या मताधिक्याची संधी निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, छगन भुजबळ, डाॅ. अमोल कोल्हे काँग्रेसच्या सभेला न येण्यातच `विजय आपलाच आहे`. हा निकाल पक्का आहे, असे हवेलीचे शिवसेना नेते शंकरनाना हरपळे व शिवसेनेचे पुरंदर तालुका प्रमुख दिलीप यादव यांनी दौऱयात प्रतिपादन केले.

शिवतारेंनी विकासकामांचा डोंगर उभा केला व अजूनही कितीतरी कामे दृष्टीपथात आणल्याने सत्तेतील लोकप्रतिनीधी म्हणून शिवतारेंना लोकांची पक्की पसंती आहे., असे जालींदर कामठे प्रचारानिमित्त म्हणाले.  

पुणे जि.प.चे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्यासह यादव, हरपळे, भाजप नेते बाबा जाधवराव, माजी आमदार संभाजी कुंजीर, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष पंडितदादा मोडक, पुरंदर तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, गंगाराम जगदाळे, संदीप मोडक, कैलास ढोरे, संगीताराजे निंबाळकर, गिरीश जगताप, धनंजय कामठे, केशव कामठे, सभापती रमेश जाधव, अतुल म्हस्के, अर्चना जाधव, युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप, राहुल शेवाळे, गणपत दगडे, सचिन भोंगळे आदींची मोठी फळी महायुतीचे उमेदवार श्री. शिवतारेंसाठी अजूनही राबत आहे.  
 
कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांना प्रचारसभा नाकारल्याने शरद पवारांनी पुन्हा ‘विजय आपलाच आहे’ हा जुना राग आळवला आहे. शेजारच्या भोर आणि हडपसर मतदारसंघात पवारांनी सभा दिली परंतु पुरंदरमध्ये मात्र त्यांनी वेळ दिला नाही. त्यांना वाऱयाचा रोख समजतो., असेही शिवसेना व भाजप नेते म्हणाले.

यादव व हरपळे म्हणाले., २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सासवडचे पालखीतळ मैदान शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेला नाकारण्यात आले होते. त्यातच कोथळे येथील एका सभेत त्यावेळचे राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार अशोक टेकवडे यांच्यावर कॉंग्रेसच्या काही लोकांनी दादागिरी केली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पवारसाहेब घरी आले असताना संजय जगताप मागच्या दाराने निघून गेले आणि पवारांचा अपमान केला. तर सचिन भोंगळे व मंदार गिरमे म्हणाले, आम्ही प्रा. दिगंबर दुर्गाडे सरांच्या 2009 च्या वेळी संजय जगताप यांनी आघाडी धर्म न पाळता केलेली बंडखोरी विसरलेलो नाही. 

हॅट ट्रीक पक्की : शिवतारे

पुरंदर - हवेलीत विकास कामे गावनिहाय मोठी केलीच. शिवाय दृष्टीपथात आलेल्या गुंजवणीच्या पाण्यासाठी, विमानतळ, राष्ट्रीय बाजार आणि कित्येक होऊ घातलेल्या प्रकल्पासाठी सत्तेतला आमदार व मंत्रीच हवा. गुंजवणी अडविणारांना धडा शिकवा. जनतेला भयमुक्त ठेवण्यासाठी आपली हॅटट्रीक पक्की आहे., असे महायुतीचे उमेदवार व राज्यमंत्री विजय शिवतारे प्रचारानिमित्त नीरा भागात म्हणाले.      

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com