शिवतारेंनी केली पाटणच्या नुकसानीची पहाणी

 शिवतारेंनी केली पाटणच्या नुकसानीची पहाणी

सातारा : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तात्काळ करावे. पाटण तालुक्यातील 47 गावांमध्ये वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युध्द पातळीवर काम करावे. तसेच  पुरामुळे नादुरुस्त पाणी योजना तातडीने दुरुस्त करुन अतिवृष्टीबाधितांना दिलासा देण्याचे काम करावे, अशा सूचना साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्या.

पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज पाटण येथील पूरग्रस्त् बाधित भागांची पहाणी करून मदत कार्याचा आढावा घेतला. यावेळी पाटणचे आमदार शुंभराज देसाई, आमदार सुनील प्रभु, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, हिम्मत  खराडे, तहसिलदार रामहरी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुनिल बोरकर, उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. या शाळांची तपासणी करुन नुकसानीचा अहवाल शिक्षण विभागाने सादर करावा, अशी सूचना करून शिवतारे म्हणाले, नदीवरील उपसा सिंचन योजना सहकारी तत्वावर सुध्दा चालविल्या जातात. या उपसा सिंचन योजना अतिवृष्टीमुळे आता बंद पडल्या आहेत. या योजना सुरु करण्यासाठी त्यांना निधीची आवश्यकता आहे. या योजना मदत व पुर्नवसन योजनेंतर्गत बसविण्यासाठी तसा प्रस्ताव द्यावा. पाटण तालुक्यातील 47 गावांचा विज पुरवठा खंडित आहे. तो पूर्ववत करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असेल तर इतर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी येथे वर्ग करावेत, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com