जगतापांनी माफी मागावी : गुंजवणीचे काम कोणी अडविले, याचे पुरावेच शिवतारेंनी केले सादर

जगतापांनी माफी मागावी : गुंजवणीचे काम कोणी अडविले, याचे पुरावेच शिवतारेंनी केले सादर

सासवड : गुंजवणी धरणाची पाईपलाईन अडवण्याशी माझा कुठलाही संबंध नाही, असा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या संजय जगताप यांच्यावर कागदपत्रांसह घणाघाती टीका राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी  पत्रकार परिषदेत केली.

पत्रकारांना सगळ्या पुराव्यांची फाईलच शिवतारे यांनी सादर केली. गुंजवणी पाइपलाइन मी मार्गी लावली. गुंजवणीचे पाणी पोचल्यावर मला किडन्यांनी साथ दिली नाही तरी चालेल. हिरवाईच्या पिकातून मी शेतकऱ्यांशी बोलेल. पण पाप करणारांना माफ करु नका., असे ते म्हणाले.

पुरंदर विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप महायुतीच्या नेत्यांची सासवड येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शिवतारे बोलत होते.

भाजप, आरपीआय आणि रासपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत शिवतारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा निर्वाळा पत्रकार परिषदेत दिला. याचवेळी शिवतारे यांनी गुंजवणीबाबत संजय जगताप यांनी कसा पुरंदरच्या जनतेचा घात केला; हे पुराव्यांसह स्पष्ट केले. पुरावे वाचून दाखविले. गुंजवणी जलविद्युत केंद्राचा ठेका संजय जगताप यांच्या सिल्व्हर ज्युबिली या कंपनीला 2005-06 साली मिळाला. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली पहिल्यांदा हरित लवादात गुंजवणी अडकवण्याचा प्रयत्न केला. पण तिथे लवादाने त्यांचे सगळे दावे फेटाळून लावले. नंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे असाच खोडसाळ खटला दाखल केला गेला.

तब्बल 27 पानी निकालपत्राद्वारे प्राधिकरणाने त्यांचा दावा फेटाळून लावला. सिल्व्हर ज्युबिलीच्या नावाने दावा दाखल केल्यास पुरंदरमधील लोक संतापतील. म्हणून पुढे त्यांनी अशोका स्थापत्य नावाच्या डमी कंपनीच्या नावाने विद्युत प्रकल्पाचे हस्तांतरण केले. मग ही कंपनी उच्च न्यायालयात गेली. न्यायालयाने इतक्या वेळा चपराक लगावल्यानंतरही त्यांचे लोक सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी वेळ मागत होते. अनेक दशके या मातीत उन्हातान्हात राबलेल्या बळीराजाची आता त्यांनी माफी मागावी. अन्यथा जनताच त्यांचा निर्णय करेल, असा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com