शिवस्वराज्य यात्रेत सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार : जयंत पाटील 

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरुन 6 ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे. शिवनेरीच्या पायथ्याला जुन्नर येथे पहिली सभा होणार आह. ही यात्रा 22 जिल्ह्यात जाणार असून 80 तालुक्‍यांना या शिवस्वराज्य यात्रेचा स्पर्श होणार आहे.
Jayant_Patil_NCp
Jayant_Patil_NCp

कोल्हापूर : राज्यात घाउक पध्दतीने भ्रष्टाचार सुरु आहे. या भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: करत असल्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेने व जनतेने पाहिले आहे.

या सगळ्यांची पोलखोल राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेत केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.

तसेच महाराष्ट्राला स्वच्छ व सक्षम सरकार देण्याचा विश्‍वास या यात्रेनिमित्त जनतेला दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून 6 ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती प्रदेशाध्यक्ष आ.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी.पाटील, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, भैय्या माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने, उद्योगपती व्ही.बी.पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

आ.पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून सत्तेत बसलेल्या राज्य सरकारला महाराजांच्या विचारांचा विसर पडला आहे.पोकळ घोषणा,बडेजाव आणि तरुण, गरीब  व अठरा पगड जातीपासून दूर गेलेल्या या शासनाचा कारभार गेली पाच वर्षे जनतेने अनुभवला आहे.

या सरकारच्या बोलण्यात व कृतीत फरक असल्याचे राज्याने पाहिले आहे. भ्रष्टाचार सनदशीर मार्गाने कसा करावा, हे या शासनाने दाखवून दिले आहे. या सर्व गोष्टींची पोलखोल जनतेसमोर करण्याची वेळ आता आला आहे. शिवस्वराज्य यात्रा ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसली तरी राज्याची जी फसवणूक झाली आहे. येथील तरुणांच्या पदरी जी निराशा आली आहे. त्यावर या यात्रेच्या काळात प्रकाशझोत टाकला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

अशी होणार यात्रा
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरुन 6 ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे. शिवनेरीच्या पायथ्याला जुन्नर येथे पहिली सभा होणार आह. ही यात्रा 22 जिल्ह्यात जाणार असून 80 तालुक्‍यांना या शिवस्वराज्य यात्रेचा स्पर्श होणार आहे. सुमारे 3 हजार किलोमीटरचा प्रवास करुन या यात्रेचा समारोप रायगड येथे करण्यात येणार आहे. या यात्रेत आ.अजित पवार, सुनिल तटकरे, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आदी नेते सहभागी होणार असल्याचे आ.पाटील यांनी स्पष्ट केले. या यात्रेत बेरोजगारांच्या नोंदी घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com