एसटीत शिवशाहीवरून राजकारण रंगले ! 

एसटीत शिवशाहीवरून राजकारण रंगले ! 

मुंबई : राज्यातील प्रत्येक गावखेड्यांपर्यंत प्रवासी वाहतूक उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीचा आज (बुधवारी) मु69 वा वर्धापन दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भगव्या रंगाचे पट्टे असलेल्या शिवशाही या दोन बसचे उद्‌घाटन करण्याचा कार्यक्रम मुंबई सेंट्रल येथे आयोजित केला आहे. 

अगोदरच एसटी आर्थिक तोट्यात असताना तिला सावरण्यासाठी काही ठोस कार्यक्रम घेण्याऐवजी रावते यांनी भगव्या रंगाचे पट्टे असलेल्या शिवशाही बसला आणून राजकारण केले असल्याच्या टीका महामंडळात होत आहेत. 

शिवशाही या नावालाही काही संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला असून हा केवळ शिवसेनेतल्या भगवा राजकारणाचा भाग असल्याचे बोलले जात आहे. शिवशाही या नावापेक्षा शिवमेघ आदी नावेही या बसला देता आली असती परंतु केवळ श्रेय घेण्यासाठी रावते यांनी हा निर्णय महामंडळावर लादला असल्याच्या प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. 
आज सुरुवातीला दोन शिवशाही या बसचे उदघाटन होणार असून त्यानंतर 500 बस एसटीत दाखल केले जाणार असल्याची माहिती महामंडळातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

दरम्यान एसटी गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात असताना त्यासाठी रावते कोणत्याही ठोस उपाययोजना करत नसून केवळ खाजगी व्यवस्थापनाच्या गाड्या एसटीत आणून मागच्या दरवाज्याने एसटीचे खाजगीकरण करत आहेत की काय , अशी चर्चाही केली जात आहे. 

शिवशाही बसही त्यातील एक प्रकार असल्याचे सांगण्यात येते. तर मुंबईत मागे सत्ता आल्यानंतर शिवसेनेने शिवशाही नावाने गृह प्रकल्प उभा केला होता, त्याचा पूर्ण बोजवारा उडाला असून यात सरकारचे कोटयवधी रुपये बरबाद झाले तसे या शिवशाही बसचे होईल अशी भितीही व्यक्त केली जात आहे  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com