शिवसेनेचे राजकारण दिशाहीन : अजित पवार

शिवसेनेचे राजकारण दिशाहीन : अजित पवार

माळेगाव : महागाईच्या मुद्दांवरून भाजपच्या विरुद्ध शिवसनेने पंतप्रधानांची अंत्ययात्रा काढण्याची भाषा केली. वास्तविक सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांविरुद्ध बोलायचे आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची ही कुठली पद्धत? शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे हे दिशाहीन राजकारण जनता ओळखून आहे, अशी टीका करून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
 
माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथे प्रतिभा विविध कार्यकारी सोसायटीच्या उद्धाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबई-अहमदाबाद ही बुलेट ट्रेन फायद्याची नसल्याचे स्पष्ट केले.

सध्या रेल्वेत मुलभूत सुविधांचा अभाव आणि त्यामुळे वाढत्या अपघातांचा धागा पकडत पवार म्हणाले, गुजरातचे हित डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकारने मुंबई-अहमदाबाद हा बुलेट ट्रेनचा निर्णय घेतला आहे. वास्तविक हा निर्णय महाराष्ट्राला अर्थिक अडचणीत आणणारा आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यासाठी राज्य सरकार विविध कुलुपत्या काढून वेळकाढूपणा करत आहे. पेट्रोल दर वाढ करून महागाईत भर घालत आहे. वीजेचे भारनियमन सुरू झाल्याने सामन्यांना जगणे मुश्किल झाले आहे. नोट बंदीच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी प्रचंड वाढली. सीमेवर सैनिक शहिद होण्याचे प्रमाणही लक्षनिय वाढले आहे, अशा अनेक टप्प्यांवर केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरलेल्याचे दिसून येते. अशा प्रतिकूल स्थितीत बुलेट ट्रेनच्या योजनेसाठी काही लाख कोटीत निधी खर्च होणे कितपत योग्य़ आहे?

`शेतकऱ्यांच्या विषयात भाजप सरकार खूपच नौटंकिबाज असून बोगस शेतकरी असा मानहानिकारक शब्दप्रयोग करताना त्यांचे मंत्री आढळून येत आहेत. मध्य़ंतरीच्या काळात राष्ट्रवादीने एकोप्याच्या जोरावर संघर्ष यात्रा काढली, पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आंदोलने केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरले. म्हणूनच सरकारला कर्जमाफी नाइलाजास्तव करावी लागली. त्यामुळे यापुढील काळात कर्तुत्वशुन्य सरकारला बाजूला करण्यासाठी प्रत्येक घटनांनी पुढे आले पाहिजे,`  असे आवाहन पवार यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com