शिवसेनेचे माजी आमदार धनराज महालेंच्या हाती `राष्ट्रवादी'चे घड्याळ

शिवसेनेचे माजी आमदार धनराज महालेंच्या हाती `राष्ट्रवादी'चे घड्याळ

मनमाड  : स्वबळावर लोकसभा निवडणुकीचा भाषा करणा-या शिवसेनेला दिंडीच मतदारसंघात ४४० व्होल्टचा झटका बसला. संभाव्य उमेदवार व माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघाचे राजकारण एकदम बदलून गेले.

समाजवादी नेते आणि माजी खासदार (कै) हरीभाऊ महाले यांचे चिरंजीव व माजी आमदार धनराज महाले शिवसेनेतील हेवेदावे आणि नेत्यांतील ओढाताण पाहता सावध झाले होते. या पार्श्वभूमीवर सावध पावले टाकीत काल त्यांनी मनमाड येथे झालेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेससाठी दिंडोरी मतदारसंघाची बांधणी भक्कम झाली.

या मतदारसंघात भाजपचे हरीश्चंद्र चव्हाण सलग तीन टर्म खासदार आहेत. मात्र सध्या त्यांना भाजपमधील गटबाजीने त्रस्त केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक्षेप आणि मतदारसंघाबाहेरील निरीक्षकांच्या बैठकांत ते एकटे पडले होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला, सहकाराचे वर्चस्व असलेला व पक्षाचे नरहरी झीलवळ आमदार असलेला दिंडोरी, आमदार पंकज भुजबळ यांचा नांदगाव यांसह कळवण व निफाड अशी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रभावी यंत्रणा या मतदारसंघात आहे. त्यातच शिवसेना व भाजप यांच्यात युतीची चर्चा कुजली आहे. त्यामुळे आता लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस येथे  बळकट झाली. उमेदवारीसाठी या मतदारसंघात आता प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार, माजी आमदार धनराज महाले हे प्रमुख दावेदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com