नारायण राणेंविरुद्ध शिवसेनेची लढाई कायम राहणार :संदेश पारकर

महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार येणार आहे. जिल्ह्यात राणे, भाजप विरुद्ध शिवसेना ही लढाई कायम राहणार आहे. -संदेश पारकर
Narayan_Rane_Sandesh_Parkar
Narayan_Rane_Sandesh_Parkar

कुडाळ :  महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार येणार आहे. जिल्ह्यात राणे, भाजप विरुद्ध शिवसेना ही लढाई कायम राहणार आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी जोमाने काम केले पाहिजे. लोकांचे जे काही प्रश्‍न असतील ते शिवसेनेच्या माध्यमातून सोडविले जावेत, यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठिशी आहोत, असे प्रतिपादन युवानेते संदेश पारकर यांनी येथे शिवसेना बैठकीत केले.
येथील शिवसेना बैठकीत प्रथमच उपस्थित राहिलेल्या व शिवसेनेत प्रवेश केलेल्या संदेश पारकर यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

यावेळी जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हा प्रमुख संजय पडते, जान्हवी सावंत, अतुल बंगे, बबन बोभाटे, राजन नाईक, राजन जाधव, श्रेया परब, अमरसेन सावंत, वर्षा कुडाळकर, स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, संजय भोगटे, संतोष शिरसाट, सचिन काळप, प्रज्ञा राणे, जीवन बांदेकर, हर्षद गावडे, शैलेश भोगले, अवधूत मालणकर, राजू गवंडे, बाळा कोरगावकर, नागेश आईर, कान्हू शेळके, डॉ. सुबोध माधव, सचिन कदम आदी उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com