शिवसैनिक म्हणतात , ओमी कालानीना शिवसेनेत नो एन्ट्री !

युती झाल्यास उल्हासनगर भाजपाच्या वाटयाला असल्याने माजी आमदार कुमार आयलानी, युथ आयकॉन ओमी कालानी, महापौर पंचम कालानी हे प्रमुख स्पर्धक आहेत .
Pancham_omi_Kalani
Pancham_omi_Kalani

उल्हासनगर :आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी ओमी कालानी यांनी पराकोटीचे  प्रयत्न चालवले आहेत . पण भाजपने उमेदवारी दिली नाही तर शिवसेनेच्या झेंड्या खाली निवडणूक लढविता येईल का याचीही चाचपणी ओमी करीत आहेत . त्यामुळे उल्हासनगर शिवसेनेच्या काही  पदाधिकाऱ्यानी आज बैठक घेऊन ओमी कालानी आम्हाला नको असा नारा दिला आहे . 

उल्हासनगरच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी आहेत . त्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत . त्यांच्याविरुद्ध २०१४ मध्ये भाजपतर्फे कुमार आयलानी फार थोड्यामत फरकाने पराभूत झालेले होते . त्यामुळे कुमार आयलानी यांना आता पुन्हा विधानसभा लढवायची असून ते कमला लागले आहेत . 

मात्र उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने ज्योती कलानी यांचे चिरंजीव ओमी कलानी यांना आपल्याकडे खेचून घेतले . महापालिका भाजपच्या ताब्यात आली . ओमी कलानी यांच्या पत्नी  पंचम कालानी यांना भाजपने महापौर पद दिलेले आहे . भाजपच्या नगरसेवकांत  ओमी कलानी यांना  मानणारया  नगरसेवकांची संख्या मोठी आहे .  ओमी कलानी यांना उमेदवारी हवीय तर कुमार आयलानी  यांनाही हवीय . भाजपमध्ये कुमार आयलानी यांचे वजन आहे . 

युती झाल्यास उल्हासनगर  भाजपाच्या वाटयाला असल्याने  माजी आमदार कुमार आयलानी, युथ आयकॉन ओमी कालानी, महापौर पंचम कालानी हे प्रमुख स्पर्धक आहेत .  त्यात भाजपा सोबत युती असल्याने आठवले गटाचे नगरसेवक व गटनेते भगवान भालेराव यानी देखील तिकीटासाठी दावा केलेला आहे.युती नाही झाल्यास भाजपा कडून वरील नावांपैकी कोण हा पेच आहे.  

त्यामुळे प्लॅन बी म्हणून ओमी कलानी यांनी शिवसेनेशीही संधान जुळवून ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत . जर भाजप सेना युती झाली नाही तर शिवसेनेकडून आपला नंबर लागावा असा ओमी कलानी यांचा प्रयत्न दिसतो आहे . 

.पप्पू कालानी पुत्र ओमी कालानी शिवसेनेच्या वाटेवर अशा   वावड्या  उठू लागताच आज शिवसेना-युवासेना-ग्राहक संरक्षण कक्ष-उत्तरभारतीय सेनेच्या  पदाधिकाऱ्यांनी बठक घेतली , या  बैठकीत ओमी कालानी यांच्या पक्षप्रवेशाला प्रखर विरोध करण्यात आला आहे .  पदाधिकाऱ्यांच्या या विरोधाला वरिष्ठ पातळीवर पोहचवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.


 शिवसेने कडून शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचे नाव शिवसैनिकांच्या तोंडी आहे.राजेंद्र चौधरी, ओमी कालानी,भगवान भालेराव यांचे फोटोज भावी आमदार म्हणून समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत. दुसरीकडे भाजपाने तिकीटा साठी प्रतिसाद दिला नाही तर ओमी कालानी हे शिवसेनेकडून प्रयत्न करणार अशा बातम्या येत   आहेत.

या प्रवेशाचे नकारात्मकत पडसाद आज शिवसेनेचे उपशरप्रमुख राजेंद्र साहू, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणी, उत्तर भारतीय शहर संघटक के.डी.तिवारी, विभागप्रमुख सुरेश सोनवणे, राजन वेलकर, शिवाजी जावळे, युवासेनेचे सागर पगारे, ज्ञानेश्वर मरसाळे,पप्पू जाधव आदिंच्या बैठकीत उमटले.

ओमी कालानी यांची स्वतंत्र टीम आहे.भाजपात त्यांच्या टिमच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे.त्यांच्या पत्नी पंचम कालानी ह्या भाजपाच्याच महापौर आहेत.मात्र ओमी यांनी भाजपा ऐवजी त्यांची टीम वाढवण्याला प्राधान्य दिले आहे.जर शिवसेनेने ओमी यांना प्रवेश दिल्यास  हीच  परिस्थिती शिवसेनेचीही होईल . ते  शिवसेनेला पोखरून त्यांची टीम मजबूत करण्यावरच लक्ष केंद्रित करन्याची शक्यता वाटते . त्यामुळे ओमी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला आजच्या बैठकीत विरोध करण्यात आला शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांची भेट घेऊन विरोध कळवला आहे.अशी माहिती युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे यांनी दिली.

यावृत्ताला राजेंद्र चौधरी यांनी दुजोरा दिला आहे. पदाधिकाऱ्यांचा हा विरोध पालकमंत्री एकनाथ शिंदे,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कळवणार असे चौधरी यांनी सांगितले.

या संदर्भात ओमी कालानी यांच्याशी संपर्क साधला असता ते , म्हणाले आपण अद्यापतरी शिवसेनेकडे तिकीटासाठी गळ घातलेली नाही. मात्र माझया विषयी शहरात निगेटिव्ह वातावरण तयार करण्यात येत आहे. त्याचे रूपांतर लवकरच पॉझिटिव्ह मध्ये परिवर्तित होणार आहे . वेट अँड वॉच अशी प्रतिक्रिया ओमी कालानी यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com