माफ करा उद्धव साहेब, आमचे मत राज ठाकरेंच्या मनसेला !

..
Shivsena-MNS
Shivsena-MNS

घाटकोपर : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपाने राज्यात युतीची घोषणा केली असली तर घाटकोपर मधील शिवसैनिकांनी युतीला पाठ दाखवत उघड उघड नाराजी व्यक्त करत भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन होर्डिंग द्वारे केले आहे .

घाटकोपर पश्चिम मधून राम कदम हे महायुतीचे उमेदवार आहेत . आज राम कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्रेयस सिग्नल जवळ मोठे शक्तिप्रदर्शन केले . राम कदमांचा अर्ज भरण्यासाठी सेनेचे पदाधिकारी न आल्याने तसेच एका कट्टर शिवसैनिकाने होर्डिंग लावून थेट पक्षश्रेष्टींनाच आवाहन केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे .

या शिवसैनिकाने आपले नाव न टाकता एक कट्टर शिवसैनिक असे लिहून या होर्डिंगवर भाजपाचे किरीट सौमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत साहेब तुम्ही त्याला उमेदवारीसाठी विरोध दर्शवला होता त्यावेळी आम्हा शिवसैनिकांना तुमचा सार्थ अभिमान वाटला .

गतवर्षी भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात महिलांचा अपमान केला होता त्यावर प्रतिक्रिया देऊन तुम्ही अशा आमदाराला कुठल्याच पक्षाने तिकीट देऊ नका असे जाहीर केले होते . 

त्याच आमदाराला युतीची उमेदवारी दिली आहे . माफ करा साहेब यावेळी भाजपाला मतदान नाही , आमचे मत राज ठाकरेंच्या मनसेला . आपला घाटकोपरचा कट्टर शिवसैनिक . होर्डिंगवरील शिवसैनिकाच्या या मथळ्यामुळे युती मधील शिवसैनिकांची उघड उघड नाराजी दिसून येते आहे . शिवसैनिकांच्या या नाराजीच भाजपाला फटका बसणार का अशी आता चर्चा घाटकोपर मधील मतदारांमध्ये होते आहे . 

मनसेचे वरळीचे ऋण शिवसैनिक घाटकोपर मध्ये फेडणार ? 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे . ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण राज्याच्या नजरा या विधानसभेवर लागून राहिल्या आहेत . अशातच ईव्हीएमच्या विरोधात रणशिंग फुंकणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे .

राज्यात राज ठाकरे यांनी निवडणुकीत 150 उमेदवार दिले असताना वरळी विधानसभेतून देखील मनसे उमेदवार देणार का या चर्चेला राज ठाकरे यांनीच पूर्ण विराम दिल्याने मनसेचा आदित्य ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा असल्याचे दिसून येते . मनसेच्या या निर्णयाने शिवसैनिकांमध्ये आनंद उफाळून आल्याचे दिसते आहे .

मनसेचे वरळीचे ऋण शिवसैनिक घाटकोपर मध्ये फेडणार  असेच एकंदरीत चित्र दिसते आहे . घाटकोपर विधानसभेत शिवसैनिकांनी उघड उघड लावलेल्या होर्डिंगबाजी मुळे सैनिकांच्या नाराजीचा फायदा मनसेचे गणेश चुक्कल यांना होऊ शकतो असे एकंदरीत समीकरण दिसते आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com