Shivsena workers beat a youth for defaming Pawar - Thakare | Sarkarnama

सोशल मीडियावर ठाकरे -पवारांची बदनामी करणाऱ्यास शिवसैनिकांचा चोप

सरकारनामा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

शिवसैनिकांनी व्हिडीओद्वारे बदनामी करणाऱ्या तरुणाचे घर शोधून काढले .  त्याच्या  घरात शिरून शिवसैनिकांनी त्याला चोप देऊन कापूरबावडी पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठाणे  : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बदनामी करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करणाऱ्या एका तरुणाला चांगलाच महागात पडला. या तरुणाला शिवसैनिकांनी चोप देऊन कापूरबावडी पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना सोमवारी (ता. 2) रात्री घडली.

याप्रकरणी, कापूरबावडी पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 151 कलमानुसार गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राघव बामनवार (40) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव असून तो ठाणे महापालिकेच्या माजिवडा येथील आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतो. 

राघव याने शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी करणारा व्हिडीओ मोबाईलवर आणि समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केला होता. हा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हॉट्‌सऍपवर पाहून ठाण्यातील शिवसैनिकांनी त्याची दखल घेतली . 

शिवसैनिकांनी व्हिडीओद्वारे बदनामी करणाऱ्या तरुणाचे घर शोधून काढले .  त्याच्या  घरात शिरून शिवसैनिकांनी त्याला चोप देऊन कापूरबावडी पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान कापूरबावडी पोलिसांनी राघव बामनवार याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 151 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख