विठ्ठला उद्धवना मुख्यमंत्री कर - १०० किलोमीटर अनवाणी चालत येऊन शिवसैनिकाचे साकडे

Shivsena Worker from Sangli District Prays Vitthal For Uddhav Thakrey
Shivsena Worker from Sangli District Prays Vitthal For Uddhav Thakrey

पंढरपूर : 'बा विठ्ठला आम्हा शिवसैनिकांचे दैवत आणि शेतकऱ्यांचा तारणहार उध्दव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळू दे,' असे साकडे जत (जि.सांगली) तालुक्यातील एका सच्च्या शिवसैनिकाने सहपत्नीक अनवाणी चालत येवून आज विठ्ठल रुक्मिणीला  घातले. 

बनाळी (ता. जत. जि. सांगली) येथील संजय आणि रुपाली सावंत या पतीपत्नी शिवसैनिकांनी सुमारे 100 किलोमीटर अंतर अनवाणी चालत येवून विठुचरणी हे  साकडं घातलं. दरम्यान उद्या (ता.15) उध्दव ठाकरे हे नकुसानीची पाहाणी करण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते आल्यानंतर त्यांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून  तुळशीची माळ आणि चंद्रभागेचे तीर्थ भेट देण्यात येणार आहे. विठ्ठलाचा हा प्रसाद  विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य तथा जिल्हा शिवसेना प्रमुख संभाजी शिंदे यांनी श्री. सावंत यांच्याकडे सुपूर्त केला.

गेल्या आठरा दिवसांपासून राज्यात सत्तेचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपने सरकार स्थापन करणार नसल्याचे  स्पष्ट केल्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे नवीन राजकीय समिकरण आकाराला येण्याची शक्यता आहे. हे नवीन राजकीय समिकरण जुळून आले, तर मुख्यमंत्री हे उध्दव ठाकरेच व्हावेत यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय सावंत व त्यांच्या पत्नी रुपाली  यांनी सलग तीन दिवस अनावनी पायी चालत सुमारे 100 किलोमीटर प्रवास करुन विठ्ठलाला आज साकडे घातले.

उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी राज्यभरातील शिवसैनिकांची तीव्र इच्छा आहे. अनेक शिवसैनिकांनी यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत तर अनेकांनी  पण  देखील केला आहे. तर  काहींनी देवाला साकडे घातले आहे. कष्टकरी शेतकर्यांचे दैवत असलेल्या विठ्ठलाला देखील अनेक शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांच्यासाठी साकडे घातले आहे. सांगलीच्या संजय सावंत यांनी  मात्र चक्क पायी अनवानी चालत निरंकार उपवास करत उध्दव ठाकरेंसाठी पायी  पंढरीची वारी केली आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com