शिवसेना प्रचाराविना जिंकणार: आदित्य ठाकरे

Aditya-Thakre-Ulhasnagar.
Aditya-Thakre-Ulhasnagar.

उल्हासनगर : " इतर पक्ष  निवडणूका आल्या की पाच वर्षांनी  कामाला लागतात.मात्र शिवसेनाच सतत पाच वर्षे समाजकारण करून विकासकामांचा रिझल्ट देत असल्याने शिवसेनेला प्रचाराची गरज नाही,तर शिवसेना प्रचाराविना निवडणूक जिंकणार,"  असा  विश्वास युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उल्हासनगरात व्यक्त केला.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पाठपुराव्यामुळे उल्हासनगर शहराच्या मध्यभागी असलेल्या व जर्जर झालेल्या कामगार हॉस्पिटल जागी अद्यावत असे 100 खाटांचे 125 कोटी रुपयांच्या निधीतून नव्याने रुग्णालयाची उभारणी होत आहे.त्याचे भूमिपूजन केल्यावर आदित्य ठाकरे बोलत होते. 

कामगार आणि त्यांचे आरोग्य याकडे शिवसेनेने कटाक्षाने लक्ष दिलेले आहे.शिवसेना हा देशातील पहिला पक्ष आहे ज्याने पहिली रुग्णवाहिका सेवा सुरू केली.108 क्रमांकाची रुग्णवाहिका व बोट रुग्णवाहिका याचे श्रेय देखील शिवसेनेलाच जाते.

आज खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खा.चंद्रकांत खैरे यांच्या पाठपुराव्यामुळे उल्हासनगरात भव्य मोठे आणि प्रशस्त कामगार रुग्णालय उभारले जाणार आहे.आज त्याचे भूमिपूजन झाले असून लवकरात लवकर ही वास्तू उभी करावी अशा सूचना ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उल्हासनगरकरांना प्रशस्त कामगार रुग्णालयाची भेट देण्यात येणार असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता आज श्रीकांत शिंदे, चंद्रकांत खैरे यांनी केली असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

2016 मध्ये या कामगार रुग्णालयाच्या इमारतीची बघितलेली दुरावस्था दिल्लीतील संसदेत मांडली.त्यासाठी चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली 125 कोटीचा निधी या रुग्णालयासाठी मंजूर झाला अशी माहिती खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिली.

कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ.बालाजी किणीकर, आ.सुभाष भोईर, महापौर विनिता राणे, कडोंमपाचे स्थायी समितीसभापती दीपेश म्हात्रे, विरोधीपक्ष नेते धनंजय बोडारे, महिला आघाडी संघटक मनीषा भानुशाली, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, सुमित सोनकांबळे, भाजपाचे माजी आमदार जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, सभागृहनेते जमनादास पुरस्वानी, मनोज लासी, डॉ.प्रकाश नाथानी, प्रकाश माखिजा आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com