बीड नगर पालिकेवर पुन्हा भगवाच फडकणार : कुंडलिक खांडे

भविष्यात होणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत बीड नगर पालिकेवर भगवाच फडकणार असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला
We Will Rule Beed Corporation agains Say Shivsena Leader Kundlik Khande
We Will Rule Beed Corporation agains Say Shivsena Leader Kundlik Khande

बीड : बीडच्या जनतेने कायम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला स्थान दिलेले आहे. मध्यंतरी विरोधकांनी थोडे डोके वर काढले होते. परंतु, त्यांनी बीडमधील युवकांचा स्वत:च्या स्वार्थासाठी उपयोग करुन घेतल्याचे आता युवकांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत बीड नगर पालिकेवर भगवाच फडकणार असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेत येणाऱ्या युवकांनी घाबरु नये, शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी आहे असा विश्वासही त्यांनी दिला. रविवारी शहरात ११ शाखांचे एकाच दिवशी उद॒घाटन करण्यात आले. यावेळी श्री. खांडे बोलत होते. डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले, ''शिवसेना म्हणजे युवकांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे. तुम्हाला प्रत्येक क्षणाला आम्ही साथ देवू. खांडे म्हणाले, बीड हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. यापुढेही तो कायम राखण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. शिवसेनेत शिवसैनिक हेच पद सर्वोच्च आहे.'' शिवसैनिक हा निडर असतो आणि तुम्ही सुध्दा कुणाच्या दबावाला बळी न पडता बाळासाहेबांचे विचार तळागाळात रुजवण्याचे काम करा, असे आवाहन कुंडलिक खांडे यांनी केले. 

बीडमध्ये काही स्वार्थी लोकांना स्वत:च्या स्वार्थासाठी युवकांचा वापर केल्याचा घणाघातही खांडे यांनी केला. उपजिल्हाप्रमुख बंडू पिंगळे, किसान सेनेचे परमेश्‍वर सातपुते, सभापती भीमराव वाघचौरे, तालुका प्रमुख गोरख सिंघन, शहाप्रमुख सुनिल सुरवसे, जिल्हा विधानसभा समन्वयक नितीन धांडे, जिल्हा संघटक रतन गुजर, नगरसेवक किशोर पिंगळे, भास्कर जाधव, बिभीषण लांडगे, शिवाजी जाधव, सुशिल पिंगळे, बाळासाहेब वाघचौरे, कल्याण कौचट, सखाराम देवकर, सुमंत रुईकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com