Shivsena will get lead from Radhanagari : Prakash Abitkar | Sarkarnama

राधानगरीतून यावेळी शिवसेनेला मताधिक्‍य: आ.प्रकाश अबीटकर  

निवास चौगले :सरकारनामा
बुधवार, 15 मे 2019

शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना मताधिक्‍य असेल.

-आ. प्रकाश अबीटकर

कोल्हापूर :  लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना मताधिक्‍य होते, यावेळी श्री. महाडिक यांना नाही तर शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना मताधिक्‍य असेल, असा विश्‍वास या मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश अबीटकर यांनी 'सरकारनामा' शी बोलताना व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्‍वभुमीवर श्री. अबीटकर यांच्याशी संपर्क साधला. 2014 च्या निवडणुकीत या मतदार संघात श्री. महाडिक यांना तब्बल 24 हजारांचे मताधिक्‍य होते. यावेळी मात्र राजकीय गणिते वेगळी आहेत. 2009 च्या निवडणुकीत याच मतदार संघातील मतदारांनी कै. सदाशिवराव मंडलिक यांना विक्रमी म्हणजे तब्बल 44 हजारांचे मताधिक्‍य दिले होते. या पार्श्‍वभुमीवर त्यांचे पुत्र प्रा. मंडलिक यांना किती मताधिक्‍य मिळेल असे श्री. अबीटकर यांना विचारले. 

ते म्हणाले,"यावेळी आमच्या (प्रा. मंडलिक) उमेदवारालाचा चांगले मताधिक्‍य असेल. गेल्या निवडणुकीत विरोधी उमेदवार श्री. महाडिक यांना मताधिक्‍य होते, ते यावेळी त्यांना मिळणार नाही, उलट आम्हाला ते मताधिक्‍य मिळेल. पण किती मताधिक्‍य असेल हे सांगणे कठीण आहे. लोकांचा अंदाज आलेला नाही, मतेही यंत्रात बंद झाली आहेत. 23 मेला याचा उलगडा होईल.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख