पाच दिवसांत सरकार स्थापनेची प्रक्रीया पूर्ण : संजय राऊत

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन होणार - संजय राऊतांची माहिती
New Government in Maharashtra By December First Week Claims Sanjay Raut Claims
New Government in Maharashtra By December First Week Claims Sanjay Raut Claims

नवी दिल्ली : पुढील 5 दिवसांत सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल, असा दावा शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केला. राज्यात सरकार स्थापनेबाबत अजूनही चर्चेची गुऱ्हाळे सुरुच आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप आपली भूमीका स्पष्ट केलेली नाही.

काल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार होती. मात्र, काल ती होऊ शकली नाही. ही बैठक आज होण्याची शक्यता आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, " येत्या 2 दिवसांत सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ठ होईल. डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात सेनेचा मुख्यमंत्री होईल." राष्ट्रवादी च्या नेत्यांना आम्ही भेटत असतो असे सांगतानाच प्रत्येक पक्षाची काम करण्याची एक पद्धत असते, असे सांगत राऊत यांनी चर्चांबाबत होत असलेल्या विलंबाचे समर्थन केले.

''ज्यांना वाटते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू राहावी,सेनेचा मुख्यमंत्री होऊ नये असे वाटते ते अफवा पसरवतात. आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस बैठकी नंतर चित्र स्पष्ट होईल,'' असेही राऊत म्हणाले. 

राज्यात सत्तास्थापनेबाबत शिवसेना भाजपलाच विचारा असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकांना बुचकळ्यात टाकले होते. मात्र, आता राज्यात सत्तास्थापनेबाबतच्या चर्चा अंतीम टप्प्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com