साताऱ्यात उदयनराजेंविरोधात शिवसेना उमेदवार देणार : दिवाकर रावते

''सातारा लोकसभेची जागा शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे छत्रपतींच्या विरोधात नव्हेत तर आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारा विरोधात लढणार आहोत. आम्ही कोणाला ऑफर देत नाही. शिवसेनेच्या ध्येय, धोरणात जे बसते त्यांचाच आम्ही सन्मान करतो," असे स्पष्ट मत प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले.
Diwakar Raote - Udayanraje
Diwakar Raote - Udayanraje

सातारा : ''सातारा लोकसभेची जागा शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे छत्रपतींच्या विरोधात नव्हेत तर आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारा विरोधात लढणार आहोत. आम्ही कोणाला ऑफर देत नाही. शिवसेनेच्या ध्येय, धोरणात जे बसते त्यांचाच आम्ही सन्मान करतो," असे स्पष्ट मत प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले.

सातारा शासकिय विश्रामगृहात त्यांच्याशी पत्रकारांनी आज संवाद साधला. सातारा लोकसभेच्या जागेविषयी काय सांगाल, असे विचारले असता मंत्री रावते म्हणाले, ''साताऱ्याची जागा शिवसेनेकडेच राहणार असून ती आम्ही लढणार आहोत. लोकसभेत उमेदवार महत्वाचा नसतो पक्ष लढतो आणि तोच महत्वाचा आहे. साताऱ्याबाबत मी छत्रपतींशी सह्याद्रीवर भेटलो होतो. त्यावेळी भाजपचे चार मंत्री त्यांना गराडा घालून उभे होते. छत्रपतींच्या विरोधात कोणीही उभे राहू नये. छत्रपतींचा घराण्याचा मान म्हणून साताऱ्याची ही एकमेव जागा असली पाहिजे. पण पक्ष म्हणून उदयनराजे लढलेत तर त्या पक्षाच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. राष्ट्रवादीने ही जागा त्यांना पक्की असल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही लढणार आहोत."

तुम्ही उदयनराजेंना ऑफर दिली होती का, यावर मंत्री रावते म्हणाले, "आम्ही कोणाला ऑफर देत नाही. शिवसेनेच्या ध्येय, धोरणात जे बसतात, त्यांचे आमचे जमते त्यांचा सन्मान आहे. अलिकडे एक नवीन प्रघात आला आहे. गेल्यावेळी युतीमध्ये निर्णय झाल्यामुळे रिपब्लिकन पक्षाला साताऱ्याची जागा दिली होती. यावेळेस आम्ही साताऱ्यातून लढणार आहोत. रिपब्लिकन पक्षाकडे हा मतदारसंघ नाही." यावेळेस छत्रपतींच्या वंशजाविरोधात शिवसेना उमेदवार देणार आहे का, या प्रश्‍नावर रावते म्हणाले, छत्रपतींच्या विरोधात आम्ही उमेदवार देत नाही तर पक्षाच्या विरोधात उमेदवार देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com