कार्यकर्त्यांच्या दबावामुळेच गुजरात निवडणूक लढविण्याचा निर्णय : संजय राऊत - Shivsena will contest 40 seats in Gujrat | Politics Marathi News - Sarkarnama

कार्यकर्त्यांच्या दबावामुळेच गुजरात निवडणूक लढविण्याचा निर्णय : संजय राऊत

संपत देवगिरे
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

"गुजरातच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर येऊन उध्दव ठाकरेंवर प्रचंड दबाव आणला. गुजरात सरकार विरोधात तीव्र भावना असल्याचे त्यांनी मांडले. त्यामुळेच गुजरात विधानसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय बदलावा लागला, आता चाळीस ते पन्नास जागांवर शिवसेना उमेदवार देईल," अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.

नाशिक : "गुजरातच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर येऊन उध्दव ठाकरेंवर प्रचंड दबाव आणला. गुजरात सरकार विरोधात तीव्र भावना असल्याचे त्यांनी मांडले. त्यामुळेच गुजरात विधानसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय बदलावा लागला, आता चाळीस ते पन्नास जागांवर शिवसेना उमेदवार देईल," अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.

खासदार राऊत यांनी येवला व दिंडोरी विधानसभा मतदारसंघांत पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्यात त्यांना अपशकुन करु नये अशी आमची भूमिका होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, गुजरातच्या कार्यकर्त्यांची मातोश्रीवर रीघ लागली होती. पदाधिकाऱ्यांनी शिवसेना कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सरकार विरोधातील वातावरण असल्याचे सांगितले. त्यामुळे निर्णय बदलला,"

राज्यात केव्हाही निवडणुका
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांत केव्हाही निवडणुका होतील असे वातावरण आहे. त्यामुळे सगळ्यांची मनोमन तयारी सुरु आहे. पश्‍चिम महाराष्ट्र व नाशिकची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे सगळ्या मतदारसंघात दौरा सुरु आहे. स्वतः उध्दव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करीत आहेत. त्यानंतर ते कोल्हापुर व नाशिकलाही दौरा करतील. सगळीकडे शिवसेनामय वातावरण जानवते आहे. शिवसेना उत्तर महाराष्ट्रातील जागांच्या बळावर राज्यात सरकार स्थापन करेल असा विश्‍वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख