साताऱ्यात शिवसेनेचा सहा मतदारसंघावर दावा : नितीन बानगुडे पाटील

Nitin Bangude Patil Shivsena
Nitin Bangude Patil Shivsena

उंब्रज :  ''कराड उत्तरसह जिल्ह्यातील सहा मतदारसंघ शिवसेना पूर्ण ताकतीने लढवणार असून कराड उत्तर,माण-खटाव, वाई,पाटण,फलटण,कोरेगाव हे मतदारसंघ सेना जिंकण्यासाठी लढणार आहे. कराड उत्तर मतदार संघात नविन  चेहऱ्याला उमेदवारी दिली जाईल. पक्ष बदल करणाऱ्या उमेदवाराला संधी देणार नाही. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे," असे आवाहन शिवसेनेचे उपनेते सातारा सांगली संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. 

उंब्रज ता.कराड येथे झालेल्या भाजप व राष्ट्रवादीच्या मेळाव्यांनी जिल्ह्यात विधानसभेचा बिगुल वाजला आहे. जिल्हयातील चार मतदारसंघातील उमेदवारांची नावे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केल्याने  शिवसेना कार्यकर्ते संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

कराड उत्तर या युतीत शिवसेनेच्या वाटणीला आलेल्या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मनोज घोरपडे यांची घोषणा केल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांत चुळबुळ सुरू झाली. तसेच साताऱ्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले तर माण-खटाव मधून जयकुमार गोरे हे भाजप मध्ये डेरे दाखल झाले आहेत. याचा अर्थ आठपैकी सहा ठिकाणी उमेदवारी नक्की असेल, तर शिवसेनेचे काय यावरून शिवसैनिक हवालदिल झाले होते. शिवसेना कार्यकर्त्यांतील संभ्रम दुर करण्यासाठीबानूगडे पाटील यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. 

ते  म्हणाले, ''कराड उत्तरसह जिल्ह्यातील सहा मतदारसंघ शिवसेना पूर्ण ताकतीने लढवणार असून कराड उत्तर,माण-खटाव, वाई,पाटण,फलटण,कोरेगाव हे मतदारसंघ सेना जिंकण्यासाठी लढणार आहे. कराड उत्तर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाट्याचे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे आहेत आणि या जागेवर शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार उभे राहतील. त्यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना कोणत्याही परिस्थितीत कोणालाही सोडणार नाही. जिंकण्याची  परिस्थिती मतदारसंघात सद्यस्थितीला आहे.''लोकांना परिवर्तन पाहिजे आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

''कार्यकर्त्यांनी कोणताही किंतू परंतु मनात न बाळगता विधानसभेच्या तयारीला लागण्यासाठी आम्ही पक्षीय पातळीवर आदेश दिले आहेत. त्याबरोबरच पूर्ण सातारा जिल्ह्याचा आढावा घेऊन उमेदवाराबाबत चाचणी केली असून याबाबतचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. माण-खटाव मतदार संघातून जयकुमार गोरे यांनी नुकताच भाजप प्रवेश केला मात्र बानुगडे पाटील यांनी शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.  माण खटाव मतदार संघ पहिल्यापासून सेनेचा असल्याने तिथे शेखर गोरे हेच सेनेचे उमेदवार असतील याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,''असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com