शिवसैनिकांना आदेश : परवानगीशिवाय युतीच्या बैठकीला जाऊ नका

शिवसैनिकांना आदेश : परवानगीशिवाय युतीच्या बैठकीला जाऊ नका

नागपूर : जागा वाटपावरून युतीत तणाव निर्माण झाला आहे. कुठल्याही क्षणी युती तुटण्याची शक्‍यता लक्षात घेता शिवसैनिकांना परवानगीशिवाय युतीसंदर्भातील कुठल्याही बैठकांना उपस्थित राहू नये, असे आदेश देण्यात आले.

रवीभवन येथे काल शिवसेनेची बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या बैठकीला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, माजी आमदार व खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशीष जयस्वाल, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, राजेंद्र हरणे, युवासेनाप्रमुख शुभम नवले यांच्यासह जिल्हाभरातील प्रमुख शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

सुधीर सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व सहा मतदारसंघातील लढतीची व इच्छुक उमेदवाराची चाचपणी केली. यासोबतच विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामीण भागात सर्व सहा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या भव्य मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. शिवसैनिकांनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी, असेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले, नंदा लोहबरे, रचना कन्हेर, अंजुषा बोधनकर. मनीषा इगळे, देवेंद्र गोडबोले, वर्धराज पिल्ले, दिलीप मुळे, दिवाकर पाटणे आदी उपस्थित होते.

प्रशांत किशोर यांचा सल्ला
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे नियोजन प्रशांत किशोर करीत आहेत. सत्ता असल्याशिवाय शिवसेना वाढणार नाही, असा त्यांचा सल्ला आहे. मात्र, शिवसेनेची युतीमध्ये होणारी घुसमट ही कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागत आहे. याकडेही शिवसेनेच्या वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी चर्चा बैठकीनंतर रविभवन परिसरात रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com