shivsena warned muncipal officer | Sarkarnama

डोळा फोडण्याचा शिवसेनेचा इशारा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मुंबई ः मुंबईत 500 चौरस फुटांच्या मालमत्तांना मालमत्ता करातून सूट आणि 700 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना सवलत देण्याचा ठराव पालिका सभागृहात मंजूर झाला असला, तरी प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. हा निर्णय मंजूर होऊ नये, यासाठी झारीतले शुक्राचार्य कार्यरत आहेत. त्यांचा डोळा फोडण्याचे काम शिवसेना करेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

6 जुलै 2017 रोजी पालिकेने मंजूर केलेला हा ठराव नगर विकास खात्याकडे पाठवला आहे. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शिवसेनेने वचननाम्यात घरांना मालमत्ता करात सूट देण्याचे आश्वासन दिले होते.

याबाबत शिवसेनेच्या 16 आमदारांच्या सह्यांचे पत्र सोमवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना देण्यात आले. आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ, सार्वजनिक गणेश मंडपांवरील कारवाई आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.

शिवसेनेचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली. आरोग्य सेविकांचे मानधन पाच हजारांवरून 10 हजार रुपये करावे. दिवाळीपूर्वी याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली.

मंडपांचा मुद्दा
मेट्रोच्या कामांमुळे मुंबईतील 100 वर्षांपूर्वीच्या गणेश मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी नाकारली जात आहे. मूर्तीकारांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे मंडळांना दिलासा देण्यासाठी सरसकट मंडपांना परवानगी द्यावी, अशी सूचना शिवसेनेने आयुक्तांना केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख