शिवसेनेला हव्यात 'या' पाच जागा; आता लक्ष भाजपच्या भूमिकेकडे

गेल्या निवडणुकीत २०१४ साली शिवसेनेना पराभूत करत भाजपने जिंकलेल्या जागा हा सर्वात मोठा वादाचा विषय आहे. या जागा शिवसेनेला हव्या आहेत, त्या देणे कसे शक्‍य आहे असा भाजपचा सवाल आहे. मात्र, या जागा पारंपारिक असल्याने युतीधर्म निभवावा असे सेनेचे म्हणणे आहे.
Uddhav Thakrey
Uddhav Thakrey

मुंबई : शिवसेनेला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात आणि महत्वाच्या शहरात किमान एक जागा हवी आहे. त्यांचा आग्रह कितीही असला तरी ११० ते ११५ च्या वर एकही जागा देणे उचित वाटत नाही, हे कानावर घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून योग्य ते प्रत्यक्षात आणले जाईल, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.

गेल्या निवडणुकीत २०१४ साली शिवसेनेना पराभूत करत भाजपने जिंकलेल्या जागा हा सर्वात मोठा वादाचा विषय आहे. या जागा शिवसेनेला हव्या आहेत, त्या देणे कसे शक्‍य आहे असा भाजपचा सवाल आहे. मात्र, या जागा पारंपारिक असल्याने युतीधर्म निभवावा असे सेनेचे म्हणणे आहे. दोन्ही पक्षांशी संबंधित असलेल्या एका माहितगाराने ४० जागांवरून वाद आहेत असे मान्य केले. सेनेने किती जागा लढायच्या, याच बरोबर कोणते मतदारसंघ मागायचे दोन्ही पक्षातले वादाचे मुद्‌दे झाले आहेत असे समजते.

हे मतदारसंघ वादाचे
पुण्यातील कोथरूड, कॅन्टोनमेंट, हडपसर हे मतदारसंघ सेनेला हवे आहेत. नाशिक येथे भाजपच्या सीमा अहेर तसेच माजी मंत्री डॉ.दौलतराव अहेर यांचे पुत्र डॉ.राहुल यांनी जिंकलेल्या मतदारसंघांवर सेनेने दावा केला आहे. धुळे शहर मतदारसंघातून अनिल गोटे यांनी भाजपला अडचणीत आणले, तो मतदारसंघ आता आम्हाला दया, असे सेना म्हणते. सोलापूर येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जिंकलेला मतदारसंघ आम्हाला हवा आहे, असे सेनेचे म्हणणे आहे. आमचा पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला संधी दया असे म्हणणे अयोग्य आहे काय, असा सेनेचा युक्तीवाद असून सेनेचे उमेदवार जिंकून येणे अशक्‍य असताना आग्रह कशाचा, असा भाजपचा प्रश्‍न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com