शिवसेनेला हव्यात पुणे, नागपूर, नाशिक शहरात  जागा

शिवसेनेला राज्याच्या सर्व भागांत निवडून येण्याची खात्री असलेल्या जागा हव्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आपापल्या पक्षाचे अस्तित्व जपण्यासाठी दोन्ही पक्षांनी मतदारसंघशः लक्ष घालणे सुरू केले आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांबद्दलच्या आपापल्या याद्या, तसेच मागण्या भाजप- शिवसेनेने परस्परांना कळवल्या आहेत.
Devdendra Fadanavis - Uddhav Thakrey
Devdendra Fadanavis - Uddhav Thakrey

मुंबई  : शिवसेनेला राज्याच्या सर्व भागांत निवडून येण्याची खात्री असलेल्या जागा हव्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आपापल्या पक्षाचे अस्तित्व जपण्यासाठी दोन्ही पक्षांनी मतदारसंघशः लक्ष घालणे सुरू केले आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांबद्दलच्या आपापल्या याद्या, तसेच मागण्या भाजप- शिवसेनेने परस्परांना कळवल्या आहेत.

आकड्यांबद्दल वेगवेगळे दावे- प्रतिदावे करण्याऐवजी निवडून येण्याची हमी असलेल्या जागांची निवड हे उभय बाजूंचे सूत्र आहे. शिवसेनेने गेल्या निवडणुकीत केवळ ६२  म्हणजेच भाजपेक्षा अर्ध्याने कमी जागा जिंकल्याने त्यांना जागा निवडीत जरासे झुकते माप हवे असल्याचे समजते.

भाजपलाही मराठवाड्यात तसेच कोकणात स्वतःचे अस्तित्व वाढवायचे असल्याने त्यांचा या भागाबाबत काहीसा आग्रह आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपला फारसे स्थान नव्हते; पण 'मेगा प्रवेशां'मुळे ती चिंता आता मागे पडली आहे. शिवसेनेला महाराष्ट्राच्या शहरी भागात पुणे, नाशिक, नागपूर या महानगरांत कोणत्याही जागा जिंकता आल्या नव्हत्या, तेव्हा या महापालिकांत त्यांना किमान एक तरी जिंकता येणारा मतदारसंघ हवा आहे. 

भाजपसाठी ज्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यात एकही आमदार नाही, तसेच या महापालिका हद्दीत आमचे झाले आहे, असे शिवसेनेने कळवल्याचे समजते. जागांचे आकडे समसमान दाखवणे ही आमची गरज असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे, तर उद्धवजींनी आमची अडचण समजून घ्यावी, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीरपणे नमूद केले आहे.

 मित्रपक्षांसाठी १८ जागा वेगळ्या ठेवण्यावर दोघांचेही एकमत झाले आहे. उरलेल्या २७० जागा अर्ध्या वाटून घेणे ही 'मीडिया चर्चा' म्हणत उडवून दिली गेली असली, तरी शिवसेनेच्या सन्मानासाठी तसे करता येईल काय, याचा अभ्यास सुरू असल्याचे एका ज्येष्ठ भाजप नेत्याने स्पष्ट केले. जिल्हावार उपस्थितीचा विषय आज शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी नमूद केल्याचे समजते.

उच्च पातळीवर चर्चा भाजप आणि सेनेतील चर्चा अत्यंत उच्च पातळीवर सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई भेटीत मातोश्रीवर जायचे, की एकत्र पत्रकार परिषद घ्यायची यावर विचार सुरू आहे. आता आजपासून युतीसंबंधीच्या हालचाली खऱ्या अर्थाने सुरू होतील, असे समजते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com