शिवसेना चर्चेला तयार पण, लिहून द्या, संजय राऊतांचा भाजपला टोला 

शिवसेना चर्चेला तयार पण, लिहून द्या, संजय राऊतांचा भाजपला टोला 

मुंबई : सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे वाटून घेण्याबाबतच्या चर्चेला तयार असल्याचे विधान केले त्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत असे म्हणाले की भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासह सर्व विषयांवर चर्चेला तयार असल्याचे लेखी द्यावे. 

हा विषय पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाईल आणि ते या बाबतची निर्णय घेतील. शिवसेनेकडून प्रस्ताव देण्यासाठी कोणताही उशीर झालेला नाही. शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच प्रस्ताव दिलेला होता. त्यामुळे आमच्या बाजूनी हा विषय थांबलेला नाही असेही राऊत म्हणाले. 

शिवसेनेच्या प्रस्तावावर बोलताना संजय राऊत म्हणाले, की आमचा एकच प्रस्ताव होता. जे अमित शहांबरोबरच्या बैठकीत ठरले होते तोच आमचा प्रस्ताव आहे. एवढाच आमचा प्रस्ताव होता आणि आहे.शहा यांच्या उपस्थितीमध्ये जे ठरले त्याप्रमाणे करावे एवढेच आमचे म्हणणे होते. परंतु या विषयावर उशीरा का होईना भाजपने अशी तयारी दाखवली आहे हे फार समंजसपणाची आहे असे मला वाटते.भाजपने ही तयारी आधी दाखवली असती तर आतापर्यंत सरकार स्थापन झाले असते.
 
एका प्रश्नाचे उत्तर देताना राऊत म्हणाले, की राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ नये.असा निर्णय घेतला तर तो भयंकर असा डिजास्टर ठरेल जनतेच्या मनातील मुख्यमंत्री व्हावा असे आम्हाला वाटते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com