नाशिक पश्चिम मधून भाजपच्या सीमा हिरेंच्या विरोधात शिवसेनेच्या विलास शिंदेंची बंडखोरी

शहरातील पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे महापालिकेचे गटनेते विलास शिंदे यांनी उमेदवारी कायम ठेवतं भाजप समोर आव्हान निर्माण केले आहे. ते दिवसभर 'नॉट रिचेबल' होते. संध्याकाळी त्यांचा संपर्क सुरु झाला. मात्र, तोपर्यंत माघारीची वेळ संपली होती. आता भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना शिवसेनेची बंडखोरी शमविण्यासाठी झटावे लागणार आहे.
Seema HIrey - Vilas Shinde
Seema HIrey - Vilas Shinde

नाशिक : शहरातील पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे महापालिकेचे गटनेते विलास शिंदे यांनी उमेदवारी कायम ठेवतं भाजप समोर आव्हान निर्माण केले आहे. ते दिवसभर 'नॉट रिचेबल' होते. संध्याकाळी त्यांचा संपर्क सुरु झाला. मात्र, तोपर्यंत माघारीची वेळ संपली होती. आता भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना शिवसेनेची बंडखोरी शमविण्यासाठी झटावे लागणार आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. अपूर्व हिरे, भाजपच्या हिरे, वंचित व डाव्या आघाडीचे डॉ. डी. एल. कराड, मनसेचे दिलीप दातीर, बंडखोर विलास शिंदे असे पाच प्रमुख उमेदवार आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून पस्तीस नगरसेवकांसह सुधाकर बडगुजर, मामा ठाकरे आणि विलास शिंदे यांनी बंडाचे निशान फडकवले होते. तिन्ही इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर नगरसेवक दिलीप दातीर यांनी याआधीच शिवसेनेचा राजीनामा देत मनसेची उमेदवारी स्विकारली होती. 

त्यामुळे भाजपच्या आमदार हिरे यांची डोकेदुखी वाढली होती. आज योगिता हिरे, दिलीपकुमार भामरे यांसह शिवसेनेचे मामा ठाकरे, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी माघार घेतली. आता शिवसेना गटनेते शिंदे यांची बंडखोरी कायम असल्याने हा संघर्ष अधिक शिगेला गेला आहे. आता शिवसेना बंडखोर शिंदे यांच्या मागे उभे राहते कि युतीचा धर्म पाळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या मतदारसंघात सातपूर-सिडको भागात शिवसेनेचे बावीस नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपला शिवसेनेचे आव्हान राहणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या नगरसेवकांचे मन वळविण्याची मोठी कसरतं सेनेसह भाजप नेत्यांना करावी लागणार आहे. शिवसेनेला या मतदारसंघात युतीचा धर्म पाळायचा की पक्षाच्याचं बंडखोराला साथ द्यायची, असा प्रश्‍न आहे. शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचे बळ आहे. भाजपला त्याचा नक्कीच फायदा झाला असता. आता शिवसेनेच्या तिरकस चालीने भाजपची अडचण होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com