कन्नडमध्ये शिवसेनेला पुन्हा एका जावयाचा ताप; किशोर पवार रिंगणात

कन्नडमध्ये शिवसेनेला पुन्हा एका जावयाचा ताप; किशोर पवार रिंगणात

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला पराभवाचे तोंड पहावे लागले होते. या धक्‍यातून अजून शिवसेना पूर्णपणे सावरलेली नसतांना भाजपचे राज्यातील दुसरे कॅबिनेटमंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार यांनी कन्नडमधूनच शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द बंडाचे निशाण फडकावले आहे. महायुतीचे उदयसिंग राजपूत यांच्या विरोधात पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, आज अर्ज मागे घेण्याची मुदत असूनही त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे कन्नडमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला एका जावयाचा ताप होण्याची शक्‍यता आहे. 

कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांच्या विरोधात बंडखोरी केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. राज्यातील शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बंडखोरांना चांगलाच दम भरला होता. माघार न घेतल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत देखील दिले होते. जिल्ह्यातील अनेक बंडखोरांना ही मात्रा लागू पडली. परंतु औरंगाबाद पश्‍चिम आणि कन्नड विधानसभा मतदारसंघातील भाजप इच्छूकांनी मात्रा आपला बंडाचा बाणा कायम ठेवला. 

किशोर पवार हे माघार घेतली अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. शिवसेना-भाजपच्या स्थानिक आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांनी त्यासाठी बरेच प्रयत्न देखील केले, पण त्यात यश आले नाही. भाजप बंडखोर किशोर पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे आता कन्नडची निवडणुक अधिकच रंगतदार होण्याची शक्‍यता आहे. 
शिवसेना-भाजप महायुतीचे उदयसिंग राजपूत, राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव आणि भाजप बंडखोर किशोर पवार अशी चौरंगी लढत कन्नडमध्ये पहायला मिळणार आहे. किशोर पवार यांच्या उमेदवारीमुळे लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी पुकारलेल्या बंडाची आठवण या निमित्ताने पुन्हा झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com