मुस्लिम आरक्षणाबाबत शिवसेना मवाळ; एकनाथ शिंदेंनी नवाब मलिक यांच्या घोषणेला दिला पाठींबा

सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. समान किमान कार्यक्रमानुसार आम्ही निर्णय घेण्यास कटीबद्ध आहोत असे शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले
Eknath Shinde Takes Soft Stand on Muslim Reservation Issue
Eknath Shinde Takes Soft Stand on Muslim Reservation Issue

मुंबई : हे तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार असून किमान समान कार्यक्रमास आमचे सरकार बांधील आहे ,असे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. शिंदे यांच्या वक्तव्याने शिवसेनेची मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत मवाळ भूमिका असल्याचे सुचित झाले असून राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या वक्तव्यला पाठींबा शिंदे यांनी दिल्याचे मानले जाते.

मराठा आरक्षणाबबत आढावा बैठक बोलावली होती. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना शिंदे यांनी स्पष्ट वरील प्रमाणे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. समान किमान कार्यक्रमानुसार आम्ही निर्णय घेण्यास कटीबद्ध आहोत. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भात पुढील कारवाई करण्याची घोषणा केली. आमचे सरकार सर्व समाजांच्या हिताचे निर्णय घेईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com