काय सांगता? शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला!

....
bharati sonwane jalgaon mayor
bharati sonwane jalgaon mayor

जळगाव : जळगाव महापालिकेत महापौरपदासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे भारती सोनवणे यांनीं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेनेनेही त्यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित मानली जात आहे.

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे.पक्षाचे 57 सदस्य आहेत. तर शिवसेना विरोधी पक्षात आहे.त्यांचे 14 सदस्य आहे. एमआयएमचे तीन सदस्य आहे. एका जागेवर आता निवडणूक होत आहे. मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही सदस्य नाही. महापौर सीमा भोळे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. या पदासाठी 27 जानेवारीला निवड होणार आहे.

त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे माजी उपमहापौर भारती कैलास सोनवणे यांचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे गटनेते भगत बालाणी, माजी महापौर सीमा भोळे तसेच भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. तर शिवसेनेतर्फे गटनेते नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, विष्णू भंगाळे, अमर जैन आदी उपस्थित होते. उद्या (ता. 24) अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे.

विरोधी शिवसेनेने पाठींबा दिल्यामुळे शिवसेना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे भारती सोनवणे यांची महापौरपदी निवड बिनविरोध मानली जात आहे. सौ.भारती सोनवणे यांनी उपमहापौरपदही भूषविले आहे.त्यांचे पती कैलास सोनवणे हे सुद्धा नगरसेवक आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com