Shivsena Succeeds in Dharangaon Palika Prsident Election | Sarkarnama

गुलाबराव पाटलांचा डबल धमाका; मंत्रीपद अन धरणगाव पालिकेवरही नगराध्यक्षपदी शिवसेना विजयी

कैलास शिंदे
सोमवार, 30 डिसेंबर 2019

धरणगाव पालिकेवर गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल विजयी झाले होते. मात्र त्यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या रिक्त असलेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात शिवसेनेचे निलेश सुरेश चौधरी विजयी झाले. 

जळगाव : शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी राजकीय डबल धमाका केला आहे. त्यांची मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. तर त्यांच्याच मतदार संघातील धरणगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे उमेदवार निलेश चौधरी 3952दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.

धरणगाव पालिकेवर गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल विजयी झाले होते. मात्र त्यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या रिक्त असलेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. याठिकाणी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस असा तिरंगी सामना होता. मात्र भाजप व राष्ट्रवादी कॉग्रेसचा पराभव करून शिवसेनेचे निलेश सुरेश चौधरी विजयी झाले. 

निवडणुकीत एकूण सात उमेदवार उभे होते. शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव हे महत्वाचे शहर आहे. शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या विजयासाठी गुलाबराव पाटील यानी ताकद पणाला लावली होती.राज्यात सत्तेत मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार उभा केला होता. तर भाजपचाही उमेदवार होता. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष होते.

मात्र, शिवसेनेने बाजी मारली, तर आजच गुलाबराव पाटील राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रीपदाचीही शपथ घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदार संघात शिवसैनिकात आनंदाचा हा डबल धमाका आहे. त्यामुळे मतदार संघात जल्लोष आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख