Shivsena Sanjay Raut Welcomes Congress Move To Support in Maharashtra | Sarkarnama

...तर काँग्रेसचे स्वागतच : संजय राऊत

वैदेही काणेकर
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

काँग्रेस पक्ष हा राज्याचा शत्रू नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक मोठे नेते आहेत. ज्यांचे योगदान मोठे आहे. राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेसला आम्हाला पाठिंबा द्यावासा वाटत असेल तर त्याचे स्वागतच आहे, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणातल्या नव्या समीकरणाचे संकेत दिले. 

मुंबई : काँग्रेस पक्ष हा राज्याचा शत्रू नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक मोठे नेते आहेत. ज्यांचे योगदान मोठे आहे. राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेसला आम्हाला पाठिंबा द्यावासा वाटत असेल तर त्याचे स्वागतच आहे, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणातल्या नव्या समीकरणाचे संकेत दिले. 

शिवसेनेला बाहेरून पाठींबा देण्याचासाठी काँग्रेस हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून काँग्रेस आमदारांनी एक पाऊल पुढे टाकत बाहेरून पाठींबा देण्यापेक्षा थेट सत्तेत सहभागी होण्याची काँग्रेस आमदारांची हायकमांडकडे मागणी केली आहे. याबाबत अंतिम निर्णय दिल्ली हायकमांड 2 दिवसांत घेणार, अशा आशयाचे वृत्त आहे. राऊत यांना आज पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. 

भ्रमाचा भोपळा फुटला आहे, असा भाजपला टोमणा मारत राऊत म्हणाले, ''कोणी कोणाला विकत नाही घेऊ शकत हे सिद्ध झाले आहे.  राम मंदिर हा कोण्या एका पक्षाचा मुद्दा नाही. सर्जिकल स्राईक, 370 बाबत उत्सव साजरा केला गेला. आज  राज्यात भय संपले असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.''

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख